Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याआमदार डॉ. सुधीर तांबे यांना टीडीएफची उमेदवारी जाहीर

आमदार डॉ. सुधीर तांबे यांना टीडीएफची उमेदवारी जाहीर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पदवीधर, बेरोजगार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, डॉक्टर, वकील यांसह विविध आस्थापनांमध्ये काम करणारे शासकीय दिन शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करणारे नाशिक पदवीधर मतदारसंघातील आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना राष्ट्रीय शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) ने आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे…

- Advertisement -

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) च्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुणे विद्यार्थी गृह,पुणे येथे टीडीएफचे प्रदेश अध्यक्ष विजय बहाळकर यांच्या अध्यक्षतेखाली खाली झाली.

या बैठकीत फेब्रुवारी २३ मध्ये होणाऱ्या  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर संघातून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला.

 टीडीएफचे राज्य कार्यवाह हिरालाल पगडाल यांनी आ.डॉ. तांबे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन, महाराष्ट्र टीडीएफने  नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातून  डॉ. तांबे याची उमेदवारी पुरस्कृत करावी असा प्रस्ताव मांडला.

या प्रस्तावाच्या समर्थनार्थ माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, नाशिक, संजय पवार – धुळे, राजेंद्र लांडे अहमदनगर, भाऊसाहेब बाविस्कर – जळगाव, सुधीर काळे – नगर महानगर, जी के थोरात – पुणे, आदींनी  भाषणे करून प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली.

 माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी आ.सुधीर तांबे यांनी गेल्या दीड दशकात शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील सोडवलेल्या प्रश्नांचा आढावा घेतला, डॉ. तांबे शिक्षक व पदवीधर मतदारांशी सर्वदूर संपर्क ठेवलेला आहे, शिक्षक आणि पदवीधर यांच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे, त्यामुळे आगामी निवडणूकीत त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

त्यानंतर टीडीएफचे अध्यक्ष विजय बहाळकर यांनी  टाळ्यांचा गजरात डॉ.सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले टीडीएफ सातत्याने माझ्या पाठीशी उभी राहत आली आहे, त्यामुळे मी टीडीएफचाच एक घटक आहे. हजारो टीडीएफ कार्यकर्त्यांचा सातत्याने भक्कम पाठिंबा मिळाला..

या वेळी टीडीएफचे उपाध्यक्ष हनुमंतराव भोसले, के. एम. ढोमसे, अरविंद कडलग, डी. जे. मराठे, सागर पाटील, मुरलीधर मांजरे, दत्तराज सोनावळे, किशोर जाधव, शिवाजी कामथे, सुशांत कविस्कर यांच्यासह टीडीएफचे सर्व विभाग उपस्थित होते.

आमदार डॉ.तांबे यांच्या उमेदवारीचे धुळे, नंदुरबार ,जळगाव, नाशिक, अहमदनगरमधील विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी स्वागत केले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या