Friday, November 22, 2024
HomeजळगावEknath Khadse : निमंत्रण मिळाले तरी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही; खडसे...

Eknath Khadse : निमंत्रण मिळाले तरी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाणार नाही; खडसे असं का म्हणाले?

मुंबई | Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत आज रविवारी जळगावात (Jalgaon) ‘लखपती दीदीं’चा (Lakhpati Didi) मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ३० व देशातील ५० लखपती दिदींचे अनुभव,अडचणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी ऐकून घेणार आहेत. जळगाव विमानतळ परिसरात हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून चांगलेच राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Rain Update : जिल्ह्यात पावसाची ‘जोर’धार सुरूच; गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर

विधानपरिषदेचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मला या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलेले नसल्याने मी या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे. मला या कार्यक्रमाचे वेळेत निमंत्रण आले असते तर मी या कार्यक्रमाला जाणार होतो. मात्र, आता निमंत्रण मिळाले तरी मी कार्यक्रमाला जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Rain : महाराष्ट्रभरात पुढील ३-४ दिवस मुसळधार! कोणत्या भागात, कोणता अलर्ट? जाणून घ्या

एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वी आपण भाजपमध्ये (BJP) प्रवेश कऱणार असल्याचे सांगितले होते. पण अद्याप त्यांचा भाजपप्रवेश निश्चित झालेला नाही. त्यातच त्यांना मोदींच्या कार्यक्रमाचे निमंत्रणही देण्यात आलेले नाही. शासकीय कार्यक्रम असतानाही आमदार (MLA) असणाऱ्या खडसेंना निमंत्रण देण्यात आले नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

हे देखील वाचा : गोदावरी दुथडी! नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून 52 हजार क्युसेकने विसर्ग

दरम्यान, लखपती दिदी प्रशिक्षण सत्रात पंतप्रधान ६० मिनिटे भाषण करणार आहेत. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय ग्रामविकास मंत्री कमलेश पासवान,मुख्यमंञी एकनाथ शिदे, उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्यासह आदी मंत्री उपस्थित राहणार आहेत.

हे देखील वाचा : Pavel Durov Arrested : Telegram चे सीईओ पावेल ड्यूरोव यांना विमातळावर अटक, कारण काय?

मंत्री अनिल पाटलांचा खडसेंना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी आमदारांना निमंत्रण देणे आवश्यक असताना एकनाथ खडसेंना निमंत्रण देण्यात आले नाही, असे माध्यम प्रतिनिधींनी मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांना विचारले असता ते म्हणाले की, आमंत्रण हे सर्वांना दिलेले आहे. त्यांनी ते स्वीकारावे की नाही हा त्या आमदारांचा प्रश्न आहे. प्रोटोकॉल म्हणून सगळ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मी निमंत्रणाची यादी स्वतः वाचलेली आहे. खडसेंचे निमंत्रण आता सोयीनुसार असणार आहे. मात्र, त्यांना निमंत्रण देण्यात आलेले आहे, असा टोला पाटील यांनी एकनाथ खडसेंना लगावला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या