Friday, June 21, 2024
Homeनाशिकइगतपुरीत सुरु असलेल्या निकृष्ट दर्जाच्या विकासकामांची सखोल चौकशी करण्याची आमदार खोसकरांची मुख्यमंत्र्यांकडे...

इगतपुरीत सुरु असलेल्या निकृष्ट दर्जाच्या विकासकामांची सखोल चौकशी करण्याची आमदार खोसकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

इगतपुरी |प्रतिनिधी

- Advertisement -

इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघातील इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील सुरु असलेल्या निकृष्ट दर्जाचे विकास कामांची सखोल चौकशी करून सबंधितांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन आमदार हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, माझे मतदार संघातील इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील व पाठपुराव्याने वैशिष्ट्यपुर्ण, नगरोत्थान व mgp इ. योजने अंतर्गत विकास कामे मंजूर होवून प्रगतीपथावर आहेत. परंतु यातील अनेक विकास कामे अंदाज पत्रकाप्रमाणे प्रमाणे कामे सुरु नसून कुठलेही शासनाचे नियम / निकष न बाळगता अनाधिकृत पणे व बेकायदेशीरपणे कामाची कुठलीही गुणवत्ता/दर्जा न बाळगता निकृष्ट दर्जाचे कामे सुरु आहेत.

विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी तीन परिक्षा कशा द्याव्या?; सत्यजित तांबेंची परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी

याबाबत मला स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरीक यांचेकडून वेळोवेळी अनेक सुचना तक्रारी प्राप्त झालेल्या असून या बाबत मुख्य अधिकारी पंकज गोसावी यांना वेळोवेळी सुचना देवूनही अद्याप कुठलाही बदल झालेला नूसन सदर कामे संबंधित ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. सबंधित नगरपरिषद मुख्यधिकारी व त्यांचे सहकारी, कर्मचारी ठेकेदारांना पाठीशी घालून कामात गैरव्यवहार करत असल्याचे निदर्शनास येत असून यामुळे शासनाने नगरपरिषद विकासासाठी व शहराचे विकासासाठी दिलेल्या कोट्यावधी रुपये निधीचा गैरव्यवहार होत असल्याचे निर्दशनास येत आहे.

सदर कामे सुरु करतांना लोकप्रतिनिधी म्हणून मला विश्वासत घेतलेले नाही अथवा उद्घाटनावेळी मला आमंत्रितही केलेले नाही. यामुळे माझे हक्क माझेकडून हिरावले गेले आहेत. नगरपरिषदेच्या गैरव्यवहार व गैरप्रकारावर वेळोवेळी माझ्या असलेल्या तक्रारी व नियंत्रण यामुळे सबंधित अधिकारी सुडबुध्दीपोटी माझा हक्कभंग करत असल्याचे निर्दशनास येत आहे.

तरी या बाबत उच्च स्तरीय समिती नेमून सबंधित विकास कामांचे गैरव्यवहारा बाबत पडताळणी करावी व कामाचा दर्जा तपासून नगरपरिषद हदीत सुरु असलेल्या विकास कामांचा गुणवत्ता दर्जा तापासणे कामी बांधकाम साहित्य, सामुग्री इ. चे नमुने गुणवत्ता नियंत्रण पथकाकडे तपासणीसाठी देवून तज्ञांचा अहवाल मागवावा व सबंधित दोषी कंत्राटदार व त्यांचे पाठीशी असलेल्या संबंधित भ्रष्ट अधिकारी / अभियंता यांचेवर कठोर कारवाई करावी, व सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी असे निवेदनात म्हटले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या