Thursday, January 8, 2026
Homeनाशिकआमदार हिरामण खोसकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश

आमदार हिरामण खोसकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश

इगतपुरी |प्रतिनिधी| Igatpuri

इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार हिरामण भिका खोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हिरामण भिका खोसकर यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतनाना सकाळे यांच्यासह डझनभर समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

- Advertisement -

खोसकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे नाशिक व परिसरात पक्ष मजबूत होईल, असे सांगून अजित पवार यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले. खोसकर यांचा नाशिक विभागात विशेषत: आदिवासी समाजात मोठा दबदबा आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला हा दुसरा मोठा प्रवेश आहे. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी मुंबईत पक्षात प्रवेश केला होता.

YouTube video player

ताज्या बातम्या

महेश

“तेव्हा मला मुंबईकर म्हणून लाज वाटते…”; महेश मांजरेकरांकडून खंत व्यक्त

0
मुंबई | Mumbaiमुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातले राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची...