Tuesday, March 25, 2025
HomeराजकीयJitendra Awhad : मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी जितेंद्र आव्हाडांचे राहुल नार्वेकरांना पत्र; केली...

Jitendra Awhad : मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी जितेंद्र आव्हाडांचे राहुल नार्वेकरांना पत्र; केली मोठी मागणी

'या' जुन्या निकालाची करून दिली आठवण

मुंबई | Mumbai

राज्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. तसेच कोकाटे यांना या प्रकरणात १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला असून पुढील न्यायालयात जाण्यासाठी ३० दिवसांची मुभा देखील दिली आहे.

- Advertisement -

मात्र, तरीही मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे धनंजय मुंडे यांच्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबद्दल आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्रासोबत निकालपत्र पाठवत माणिकराव कोकाटे यांना तातडीने विधानसभेतून निलंबित करण्याची मागणी केली आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रात म्हटले की,” महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात न्यायालयाने (Court) दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. त्याही पेक्षा निकालपत्रात न्यायालयाने नमूद केलेल्या बाबी अत्यंत गंभीर आहेत. अतिरिक्त मुख्य न्यायालयीन दंडाधिकारी, नाशिक (Nashik) यांनी आपल्या निकालपत्रात म्हटले आहे की, “आरोपी क्रमांक 1 (माणिक कोकाटे) स्वतः राजकारणी आणि वकील असून सुद्धा आणि त्यांना परिणामांची कल्पना असूनही गुन्हा केला गेला आणि कायद्याची अवहेलना केली गेली. गरजू आर्थिक दुर्बल घटकाला दुखावणारं हे कृत्य असून वैयक्तिक लाभापोटी योजनेतील मालमत्ता हडप केली गेली. मंत्री असल्याने त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते, पण बेकायदेशीर कृत्ये केली तर कायदा त्यांना माफ करू शकत नाही. कोणीही असलं तरी फसवणुकीचे (Fraud) गुन्हे माफ करणं योग्य नाही, हा संदेश देणं आवश्यक आहे,” असे ते म्हणाले आहेत.

नार्वेकरांना पत्राद्वारे करून दिली जुन्या निकालाची आठवण

तसेच “राज्यात डिसेंबर २०२३ मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शेअर घोटाळ्यात माजी मंत्री सुनिल केदार (Sunil Kedar) यांचा सहभाग आढल्यामुळे त्यांना अतिरिक्त न्यायदंडाधिकारी यांनी पाच वर्षे कारावास व साडेबारा लाख रुपयाचा दंड ठोठावला, त्यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने लगेच दुसऱ्या दिवशी त्यांच्या अपात्रतेची अधिसूचना काढली. न्यायालयाचा निकाल आणि अस्तित्वात असलेल्या भारतीय कायद्याचा विचार करता माणिकराव कोकाटे यांना विधानसभा सदस्यपदावरून त्वरीत निष्कासित करण्याचे आदेश आपण द्यावेत”, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...