Friday, November 15, 2024
Homeराजकीयतोच न्याय कोपरगाव शहराला देणार : आमदार काळे

तोच न्याय कोपरगाव शहराला देणार : आमदार काळे

कोपरगाव|प्रतिनिधी|Kopargav

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत ग्रामीण भागातील जनतेने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडून तळागाळातील जनतेपर्यंत विकास पोहोचला आहे. कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागाच्या विकास कामांसाठी जवळपास साडे तीन कोटी रुपयांचा निधी मिळविण्यात यश मिळाले असून हद्दवाढ करण्यात आलेल्या भागातील काही रस्त्यांच्या कामाचा यामध्ये समावेश असून ही विकासकामे देखील लवकरच सुरु होणार आहे. विकासाच्या बाबतीत जो न्याय ग्रामीण भागाला दिला तोच न्याय कोपरगाव शहराला देणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

- Advertisement -

आ. काळे म्हणाले, मागील पाच वर्षात सातत्याने कोपरगाव शहराच्या प्रश्नांसाठी लढत असतांना शहरातील नागरिकांनी मोलाची साथ देवून विधानसभा निवडणुकीत दिलेल्या मताधिक्क्याने माझी जबाबदारी वाढली आहे. शहरवासीयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी निवडून येताच पाच नंबर साठवण तलावाचा प्रश्न हाती घेवून हे काम लवकरात लवकर कसे मार्गी लावता येईल त्यासाठी प्रयत्न करीत आहे.

त्याबरोबर शहरवासियांचे इतरही प्रश्न अनुत्तरीत असून ग्रामीण भागाप्रमाणे शहरातील विकास देखील गल्ली बोळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून शहर व ग्रामीण भागाचा सारखाच विकास करून विकासाचा समतोल राखणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, मंदार पहाडे, सौ. प्रतिभाताई शिलेदार, सौ. माधवीताई वाकचौरे, सुनील शिलेदार, सौ. रेखा काले, धरमशेठ बागरेचा, रमेश गवळी, बाळासाहेब रूईकर, राजेंद्र वाकचौरे, राहुल देवळालीकर, दिनकर खरे, सुनील बोरा, दत्तोबा जगताप, भरत मोरे, आनंद जगताप, अतुल काले,

ऋषिकेश खैरनार, आदर्श पठारे, मुन्ना पठाण, प्रताप गोसावी, आकाश डागा, अमोल आढाव, रवी राऊत, प्रकाश दुशिंग, सौ. रंजना गवारे, स्वाती गुप्ता, शुभम गवारे, स्वप्नील पवार, मनमोहन चावला, अंबादास आव्हाड, उमाकांत मांडगे, स्वाती मुळे, सौ. नम्रता शहा, उपासनी मॅडम, दोशी भाभी, सौ. कीर्ती जगताप, संजय देशपांडे, श्री. जोर्वेकर, प्रशांत चिकटे, श्री. चिंचपुरे साहेब, सुधाआप्पा कुलकर्णी, माधव मोरे, अमित लोढा, श्री डोशी, विनायक देशपांडे, अंजली देशपांडे, सौ. थोरात, सौ. डोंगळे, श्री. बागुल साहेब, सौ. बागले, श्री. ठोंबरे साहेब, श्री. थोरात आदी उपस्थित होते.

आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहर विकासाला झुकते माप दिले असून विकास कामांसाठी निधी प्राप्त करून दिल्यामुळे विकासाला चालना मिळाली आहे. त्यांच्या सहकार्यातून विकासाचे प्रश्न मार्गी लागणार असून कोपरगाव शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

– नगराध्यक्ष विजयराव वहाडणे

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या