Tuesday, April 1, 2025
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात येत्या दोन वर्षात सर्वांना घरे - आ. कानडे

श्रीरामपूर तालुक्यात येत्या दोन वर्षात सर्वांना घरे – आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

महाआवास अभियानाचा राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात आवास अभियान ग्रामीण भागात राबवणे असा आहे.

- Advertisement -

2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. श्रीरामपूर तालुक्यात येत्या दोन वर्षामध्ये कोणतेही कुटुंब बेघर राहणार नाही. यासाठी राज्य सरकारच्या महाआवास अभियानाला गती द्यायची आहे. लाभार्थ्यांची शंभर टक्के प्रकरणे मंजूर करण्याची जबाबदारी संबंधीत अधिकार्‍यांची राहील, अशी माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.

राज्य सरकारचे महाआवास अभियान ग्रामीण तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन आमदार लहू कानडे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर येथे प्रशासकीय इमारत येथे करण्यात आले होते. सदर बैठकीस तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे, सभापती संगीता शिंदे, जि. प. सदस्य शरद नवले, उपसभापती बाळासाहेब तोरणे, जि. प. सदस्या संगीता गांगुर्डे तसेच सर्व ग्रामसेवक, सरपंचव उपसरपंच आदी उपस्थित होते.

गटविकास अधिकारी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामपंचायतींनी गावातील जागांचे रेखांकन करुन याठिकाणी रहात असलेल्या लोकांचे ठराव करुन शक्तीप्रदत्त समितीकडे सादर करावेत. कोणत्याही स्थितीत गरिबांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा. सरपंचांनी ठरविले तर ग्रामपंचायती सर्व गरजूंना घरांसाठी जागा उपलब्ध करून देवू शकतात, असे आमदार लहू कानडे यावेळी म्हणाले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी योजनेतील सर्व अडचणी समजून घेवून त्यांचे निराकरण केले आहे. त्यामुळे कोणीही झारीतील शुक्राचार्य न बनता हा कार्यक्रम पुढे घेवून जाणे गरजेचे आहे. जमातीच्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देताना जातीच्या दाखल्यांची अडचण येत असेल तर दाखले मिळवून देण्यासाठी मोहीम राबविली जाईल, असेही आमदार कानडे यावेळी म्हणाले.

तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी आभाळे यांनी ग्रामसेवकांच्या अडचणींचे कार्यशाळेत निवारण केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

AI Centers of Excellence : महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य...

0
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य करार झाला. यानुसार, राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता...