पाचोरा Pachora (प्रतिनिधी)
नगरपालिका प्रशासन (Municipal Administration ) आणि नगराध्यक्ष संजय गोहिल ( Mayor Sanjay Gohil) यांनी सुमारे २०० कोटी रूपयांच्या आरक्षित जमिनींचा घोटाळा (reserved land scam) केला असल्याचे विरोधकांचे आरोप बिनबुडाचे (allegations of the opponents are baseless) व पालिका निवडणुकांच्या (Municipal elections) तोंडावर जनतेची दिशाभूल (Misguided) करणारे आणि आम्हाला बदनाम करण्याचे कारस्थान आहे. तथ्यहीन आरोप करणाऱ्यांची परंपरा पाहता हा परिवारच घोटाळेबाज (family is the scammer) आहे. कोणतेही पुरावे नसतांना बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही आणि गुन्हे दाखल करणार (Legal proceedings and criminal proceedings) असल्याचा इशारा आमदार किशोर पाटील (MLA Kishore Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी उद्योजक मुकुंद बिल्दिकर, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, रावसाहेब पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर, जारगावं सरपंच सुनील पाटील, शेवाळे सरपंच योगेश पाटील, माजी नगरसेवक राम केसवाणी, शीतल सोमवंशी, सतीश चेडे, वाल्मिक पाटील,रहेमान तडवी, डॉ.भरत पाटील, डॉ.शेखर पाटील, स्विय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राम्हणे आदी उपस्थित होते.
भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे। पाचोरा नगरपरिषद प्रशासन आणि नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी वर्षभरात ठराविक लोकांचे भूखंडावरील आरक्षण बेकायदेशीर रित्या काढून २०० कोटी रुपयांचा घोटाळा करून काहीं जमीनी देखील हडप केल्या. झालेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
मुकुंद बिल्दिकर यांनी सांगितले की, विरोधकांनी ज्या जमिनींच्या आरक्षणा बाबत आरोप केले आहे त्या जमिनीच्या मालकांनी नगरपालिका प्रशासनाकडे आरक्षित आरक्षण काढण्यासाठी अर्ज केले होते. त्यांच्या मागणी नुसार सर्व स्तरावर प्रशासकीय कागदपत्रे पूर्ण करून नगरविकास विभागांच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच आरक्षण काढण्यात आले आहे. ह्या जमिनी शेतकरी याची खाजगी मालमत्ता आहे.
आरोप करणाऱ्यांच्या बापांच्या नाही. तसेच खाजगी भुखंडांवरिल आरक्षण उठवण्याचे काम नगरपिलिकेने ठराव करून केले आहे ती सर्व प्रक्रिया ही कायद्याच्या कक्षेत केली आहे. या अगोदर असे अनेक आरक्षण काढण्यात आले असून आरोप करणाऱ्यांचे वडील, काका हे पालिकेच्या सत्तेत असतांना त्यांनीही काही जमिनीचे आरक्षण उठवून जमिनी विकल्या आहे.
आमदार किशोर पाटिल यांनी या कथित घोटाळ्याचे जोरदार खंडन करतांनासांगितले कि, आरक्षित शेतजमिनिंचे आरक्षण उठवण्याची प्रक्रीया गेल्या अनेक वर्षात झाल्या आहेत. अशी शेकडो प्रकरणे आहे.यात नविन असे काही नाही. ज्या कारणांसाठी या जमीनी आरक्षित करण्यात आल्या होत्या त्यातिल बहुतांशी विकास कामे शहरात झाली आहेत. तर ज्यासाठी शेतजमीन आरक्षित आहे तो प्रकल्प राबवण्यासाठी ती शेतजमीन शेतकर्यांकडुन विकत घेण्या इतपत नगरपालिकेची आर्थिक परिस्थीती नाही.
आरोप करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतांना म्हणाले कि, बिनबुडाचे आरोप करणारे अमोल शिंदे यांचे वडील पंडित शिंदे नगराध्यक्ष असतांना त्यांचे नातेवाईक तत्कालीन मुख्याधिकारी किरण देशमुख यांचे सहकार्य घेऊन विवेकानंद नगर मधील आरक्षित जगेवर नियमबाह्य शाळेचे बांधकाम केले, सुशील डेअरी जवळील नवजीवन मॉल चे बांधकाम काही फूट अतिक्रमणा केले, पाचोरा सेंट्रल मॉलच्या बिल्डिंगच्या प्रवेश द्वारासाठी बाजार समितीची जागा हडपली,सतीश शिंदे यांनी हायवे वरील डेअरीच्या बांधकामात गाडगेबाबा नगरच्या ओपन्स्पेसची तीस फुटाची जागा हडपली , जारगाव ग्रामपंचायतच्या हद्दीतील नूरानी नगरची ओपन्स्पेस कोणी हडपली.?
या परिवाराने आता पर्यंत सुमारे २७ जमिनींचे भूखंड हडपल्याचे पुरावे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दाखविले. पुढे म्हणाले कि,शिंदे परिवाराने हडप केलेल्या जमिनी आणि अतिक्रमित बांधकामांच्या नागरिकांनीअनेक वर्षांपासून तक्रारी केल्या आहेत. पंडित शिंदे यांनी त्यांच्या नगराध्यक्षांच्या कार्यकाळात विवेकानंद नगरच्या शासकीय जागेतील शाळेचे बेकायदेशीर बांधकाम लवकरच जिल्हाधिकारी यांचे आदेशाने पाडून ही जागा जनतेसाठी विकसित करण्याचा मी संकल्प करीत आहे.
जमिनी हडप करणे शिंदे परिवाराची परंपरा असून खरा घोटाळेबाज हाच परिवार असल्याचा आरोप करून बिनबुडांच्या या प्रकरणांची सुरुवात यांनी केली, तर याचा समारोप मी करणार असल्याचा इशारा आमदारांनी दिला. तसेच २०० कोटींचा कथित घोटाळ्याचे कागदपत्रे पुरविणारे सेनेचे उपजिल्हाप्रमुख एड.अभय पाटील हे ब्लॅकमेलर असल्याची माहिती पूर्ण मतदार संघाला आहे.
आमच्यावर तथ्यहीन आरोप आणि बदनामी करणाऱयांवर मानहानीचा दावा दाखल करणार असुन कायदेशिर नोटिस देणार आहे. तसेच राज्यात शिंदे गट आणि भाजपाची सत्तेत युती असली तरी स्थानिक पातळीवर भविष्यात कोणत्याही निवडणुकीत ही युती राहणार नसल्याचे आमदार किशोर पाटील यांनी निक्षून सांगितले.