धुळे dhule । प्रतिनिधी
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Dhule Agricultural Produce Market Committee) केलेला शाश्वत विकास, शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय व पारदर्शक कारभार यामुळे भाजपा आणि भदाणे गट पॅनलचा धुव्वा उडवीत आ. कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस महाविकास आघाडीच्या (Congress Mahavikas Aghadi) शेतकरी विकास पॅनलने (Farmer Development Panel) पुन्हा एकदा वर्चस्व (dominated)प्रस्थापित केले आहे.
धुळे-दादर त्रि-साप्ताहिक विशेष रेल्वेला सुरवात
…. तर जळगाव शहर पुन्हा खड्ड्यात जाणार?
या निवडणूकीत आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडून आलेल्या एका जागेसह सर्व एकूण 16 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर आ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महाविकास आघाडीने झेंडा फडकविला आहे. शेतकरी विरोधी धोरण, वाढती महागाई आणि धुळे तालुक्यात भाजपाने दिलेल्या भूलथापा यामुळे मतदारांनी धुळे बाजार समितीच्या निवडणूकीत भाजपाला धक्का दिला आहे. या निवडणूकीनिमित्ताने धुळे तालुक्यात आ. पाटील यांच्या नेतृत्वाचा करिष्मा कायम असल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे. खा.सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा दारुण पराभव झाला आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीचा निकाल आज दि.30 एप्रिल रोजी घोषीत करण्यात आला. एकूण 15 जागांवर निवडणूक लढविण्यात आली होती, त्यात आ. पाटील यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व म्हणजे 15 जागांवर प्रत्येक उमेदवाराने तब्बल 225 मतांपेक्षा अधिक अशा मोठ्या फरकाने मताधिक्क्य मिळवित विजय मिळविला आहे.
या आधी व्यापारी मतदार संघातून विजय चिंचोले यांची एक जागा महाविकास आघाडीची बिनविरोध निवडून आली होती. भाजपच्या पॅनलमधील बाळासाहेब भदाणे, रावसाहेब गिरासे, विजय गजानन पाटील या प्रमुख उमेदवारांना मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.
विजयी जल्लोष- धुळे बाजार समितीच्या हमाल मापाडी भवनात मतमोजणीला सुरुवात झाली. सर्व जागांचे निकाल घोषीत होताच आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. बाजार समितीच्या आवारात आ. कुणाल पाटील दाखल होताच फटाक्यांची आतिषबाजी, विजयाच्या घोषणा, गुलालाची उधळण, ढोलताशांच्या निनादाने परिसर दणाणून निघाला होता. यावेळी आ.कुणाल पाटील यांनी प्रथम बाजार समितीच्या प्रवेशव्दाराजवळ असलेल्या बैलगाडी या शेतकर्याच्या प्रतिकाला अभिवादन केले.त्यानंतर बाजार समितीच्या आवारात विजयी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
पाचोरा-भडगाव कृउबास वर युतीचा झेंडा
बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन तत्पर : पालकमंत्री गिरीश महाजन
भाजपाच्या मातब्बरांना धक्का
जनता ही नेहमीच विकासाच्या बाजूने असते, त्यामुळेच आ. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला धुळे तालुक्यातील जनतेने विजयाचा कौल दिला. बाजार समितीच्या निवडणूकीत सुरुवातीपासूनच भाजपाच्या बडे बडे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले होते. तर महाविकास आघाडीचे नेतृत्व करीत आ. कुणाल पाटील हे एकटेच करीत होते. खा. सुभाष भामरे, प्रा. अरविंद जाधव, माजी जि.प.अध्यक्ष मनोहर भदाणे, गजानन पाटील, महापौर प्रतिभा चौधरी, जि.प.अध्यक्ष अश्विनी पवार, गजानन पाटील, भाजपा अध्यक्ष अनुप अग्रवाल हे भाजपाच्या प्रचाराच्या मैदानात उतरले होते. दुसरीकडे आ.कुणाल पाटील यांनी बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे नेतृत्व करीत भाजपाच्या नेत्यांना धुळ चारली.
धोक्याला थारा नाही
धुळे तालुक्यातील जनता राजकारणात धोक्याला थारा देत नाही हे या निवडणूकीच्या निकालावरून दिसून आले आहे. भाजपच्या पॅनलचे बाळासाहेब भदाणे यांच्या पत्नी शालिनी भदाणे यांना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेनेकडून उमेदवारी दिली आणि आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन वेळा निवडून आणले. त्यात त्यांना एकवेळा बिनविरोध निवडून आणण्याची किमया आ.कुणाल पाटील यांनी दाखविली होती. मात्र काही महिन्यापूर्वी धुळे पंचायत समिती सभापती-उपसभापती पदाच्या निवडणूकीत बाळासाहेब भदाणे यांनी रात्रीतून वेगळा गट स्थापन करीत भाजपाशी हातमिळविणी करुन पंचायत समितीचे पद पदरी पाडून घेतले. हा धोका धुळे तालुक्यातील जनतेला रुचला नाही. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणूकीत भाजपासोबतच बाळासाहेब भदाणे गटाचा दारुण पराभव करीत धडा शिकविल्याचे बोलले जात आहे. धुळे तालुक्यातील जनता विकास आणि निष्ठेच्या राजकारणाला किंमत देते हे या निकालातून दिसून आले आहे.
40 वर्षांपासून सत्ता अबाधीत
धुळे तालुक्याच्या राजकारणात बाजार समितीवरील सत्ता महत्वाची ठरली आहे. राजकारणात अनेक स्थित्यंतर आली. मात्र माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 40 वर्षापासून काँग्रेसने आपली सत्ता अबादीत ठेवली आहे.1983 पासून माजी मंत्री पाटील यांचेच पॅनल बाजार समितीच्या निवडणूकीत विजयी होत आहे. आता पुन्हा आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवित काँग्रेस महाविकास आघाडी आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.
जनता पैशाने विकली जात नाही-आ. पाटील
बाजार समितीच्या आवारात माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जाहिर सभेत बोलतांना आ.कुणाल पाटील म्हणाले की, बाजार समितीच्या विजयाने आपण हूरळून जायचे नाही. आतापर्यंत आपण सर्वांनी जसे सामाजिक कार्य केले तसेच गावागावात सर्वसामान्य जनतेच्या सुखदुखात सामील होवून प्रत्येकाला मदत करायची आहे. विरोधी धुळे तालुक्यातील मतदारांना आणि जनेतेला पैशाने विकत घेण्याची वल्गन करीत होते. मात्र हा तालुका पैशाने विकत घेतला जाऊ शकत नाही, गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणात माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी तालुक्यातील एक-एक माणूस आणि कार्यकर्ता स्वत:च्या रक्ताने, घामाने व प्रेमाने जोडून उभा केला आहे.
आजच्या निकालाने तालुक्यातील जनतेने दाखवून दिले की तालुका पैशाने विकत घेतला जाऊ शकत नाही. हा विजय शेतकर्यांचा आणि धुळे तालुक्यातील जनतेचा आहे. आता आपण या विजयाने हुरळून जाऊ नका, बाजार समितीची निवडणूक म्हणजे जिल्ह्याची कुस्ती आपण जिंकली आहे. आता विधानसभेची म्हणजे महाराष्ट्र केसरी जिंकायची आहे. त्यासाठी आपल्याला भरपूर काम करायचे आहे, धुळे तालुक्यातील जनतेच्या ताकदीवर मी कोणत्याही लढाईला सामोरे जायला तयार आहे. यापुढे बाजार समितीचा कायापालाट करुन महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची बाजार समिती बनवायची आहे. असेही आ.कुणाल पाटील यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, गुलाबराव कोतेकर, योगेश पाटील, पंढरीनाथ पाटील, प्रशांत भदाणे, गणेश गर्दे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमोद जैन यांनी आभार मानले.
शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार
आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने एकूण 15 जागांवर निवडणूक लढविली होती. या निवडणूकीत सर्वच्या सर्व 15 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळविला आहे. सर्व उमेदवार 225 पेक्षा अधिक मताधिक्क्य मिळवित विजयी झाले आहेत. त्यात महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- सेवा सहकारी मतदार संघातून कोतेकर गुलाबराव धोंडू (850मते), ठाकरे ऋषीकेश अनिलराव (846मते), पाटील यशवंत दामू (827मते), पाटील नानासाहेब देवराम (822मते), पाटील बाजीराव हिरामण (804मते), पाटील विशाल दिलीप (802मते), माळी गंगाधर लोटन (773मते), शिंदे विश्वास खंडू (889मते), पाटील छाया प्रकाश (881मते), पाटील नयना संदिप (884), पाटील कुणाल दिगंबर (890मते), ग्रामपंचायत मतदार संघातून पाटील रावसाहेब धर्मा (694मते), पाटील योगेश विनायक (727 मते), देवरे संभाजी राजपूत (728मते), भिल सुरेश वंजी (703मते) हे उमेदवार विजयी झाले आहेत.