Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीरामपूर शहर विकासासाठी पाच कोटींचा निधी मंजूर - आ. कानडे

श्रीरामपूर शहर विकासासाठी पाच कोटींचा निधी मंजूर – आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागातील रस्त्यांच्या कामांसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीस मान्यता मिळाली असल्याची माहिती आ. लहू कानडे यांनी दिली.

- Advertisement -

श्रीरामपूर शहरातील प्रभाग 4 मधील कॉलेजपासून पूर्वेकडे जाणार रस्ता डांबरीकरण करणे 30 लक्ष, प्रभाग 12 मधील डी-1 चारीजवळील परिसरातील रस्ते डांबरीकरण करणे 35 लक्ष, प्रभाग 3 मधील अचनकनगर मधील अंतर्गत रस्ते काँक्रीट करणे 20 लक्ष, कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते डायबागाकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे 45 लक्ष, वलेशा पथ हा रस्ता डांबरीकरण करणे 15 लक्ष, कोर्टापासून बॅडमिंटन कोर्टकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे 20 लक्ष, प्रभाग 6 मधील चौधरीवस्ती अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे 25 लक्ष, दुधेडिया यांचे घरापासून अदिती अपार्टमेन्टपर्यंत रस्ता काँक्रीट करणे 10 लक्ष, अशोक बागुल यांचे प्लॉटपासून दक्षिणेकडे जाणार रस्ता डांबरीकरण करणे 18 लक्ष.

प्रभाग 9 मधील जुनी जोंधळे ब्लड बँकेकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे 30 लक्ष, झुलेलाल पथ डांबरीकरण करणे 12 लक्ष, दहावा ओटा परिसर अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे 20 लक्ष, प्रभाग 15 मधील वाणी यांचे घरापासून म्हाडाकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे 35 लक्ष, रासकरनगरमधील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे 30 लक्ष, सूर्यनगर जवळील पाटणी मळ्यातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे 30 लक्ष, प्रभाग 16 मधील प्रस्तावित एसटीपी प्रकल्पाकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे 10 लक्ष, बेलापूर रोड ते नाल्याकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे 13 लक्ष, उत्सव मंगल कार्यालयापासून नाल्याकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे 25 लक्ष, प्रकाशनगर अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे 10 लक्ष.

तसेच शहरातील विविध ठिकाणच्या कॅनॉल पुलावर काँक्रिटीकरण करणे 12 लक्ष, शहर हद्दीत विविध मुख्य थर्मोप्लाास्टिक व झेब्रा क्रॉसिंग स्ट्रिप्स मारणे 20 लक्ष, शहरातील मुख्य रोडवर दुभाजक बसविणे व सुशोभिकरण करणे 20 लक्ष अशा विविध विकासकामांना 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे शहरातील बहुतांशी प्रभागातील रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याचे आ. कानडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या