Friday, November 15, 2024
Homeराजकीयराजकीय सूडबुद्धीने जलयुक्त शिवार योजनेची चौकशी

राजकीय सूडबुद्धीने जलयुक्त शिवार योजनेची चौकशी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

राज्यातील दुष्काळी तालुक्यांना व शेतकर्‍यांना वरदान ठरलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री पंकजाताई मुंडे

- Advertisement -

यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेमुळे जलसंधारणाची कामे होऊन पाण्याची पातळी वाढली. महायुती सरकारच्या यशस्वी योजनेची महाविकास आघाडी सरकारने सूडबुद्धीने एसआयटीमार्फत चौकशी करण्याच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो, असे प्रतिपादन आ. मोनिकाताई राजळे यांनी केले.

तालुक्याच्या सीमेवर असलेला घाटशिळ पारगाव मध्यम प्रकल्प यावर्षीच्या जोरदार पावसाने पाच वर्षांनंतर प्रथमच ओव्हरफ्लो झाल्याने आ. राजळे यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य रामराव खेडकर होते.

भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा काशीबाई गोल्हार, गोकुळ दौंड, सोमनाथ खेडकर, भगवान साठे, विष्णूपंत अकोलकर, सुनील ओव्हळ, एकनाथ आटकर, सुभाष केकाण, भगवान आव्हाड, दिनकर गर्जे, महादेव जायभाये, दत्तू पठाडे, सचिन वायकर, शुभम गाडे, काकासाहेब शिंदे, अशोक खरमाटे, संजय किर्तने, वसंत पवार, वामन किर्तने, सचिन पालवे, जमीर आतार, बाळासाहेब गोल्हार, प्रकाश खेडकर, निवृत्ती ढाकणे, विष्णू खेडकर, द्रोपदाबाई खेडकर आदी उपस्थित होते.

आ. राजळे म्हणाल्या, घाटशिळ पारगाव मध्यम प्रकल्प पाच वर्षात पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला असल्याने आठ-दहा गावाचा शेतीसह पिण्याचा पाणी प्रश्न सुटणार आहे.उसाचे क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे आजचे जलपूजन हा आनंदाचा क्षण आहे. माजी मुख्यमंत्री व माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांची महत्त्वाकांक्षी व शेतकर्‍यांत लोकप्रिय ठरलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे जलसंधारणाची मोठी कामे झाल्याने अनेक गावांची पाणी पातळी वाढल्याने टँकर बंद झाले.

मात्र वर्ष झाले तरी राज्य सरकारचे काम दिसत नाही.सरकार जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करून स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहे.याचा आम्ही निषेध करतो. कार्यक्रमाचे प्रास्तविक उपविभागीय अभियंता व्ही. टी. शिंदे यांनी केले तर स्वागत लिपिक एस. टी. ढाकणे यांनी केले. सूत्रसंचालन स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ए. बी. म्हस्के तर आभार शाखा अभियंता आर .के. तांबोळी यांनी मानले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या