Monday, May 27, 2024
Homeनगरआमदार राजळे यांचा मराठा आरक्षण अंदोलनाला पाठिंबा

आमदार राजळे यांचा मराठा आरक्षण अंदोलनाला पाठिंबा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही समाजाची मागणी अत्यंत योग्य व रास्त आहे. राज्यातील सर्व मराठा समाज व मनोज जरांगे पाटील यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी ठाम भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळून विषय लवकरच मार्गी लागेल असा विश्वास आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

आंतरवली सारटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे.या पार्श्वभूमीवर उपोषणास पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज पाथर्डी यांच्या वतीने पाथर्डी येथे साखळी उपोषण सुरू करण्यात आले. आमदार मोनिकाताई राजळे यांनी आज या उपोषणस्थळी उपस्थित राहुन मराठा आरक्षण मिळावे या करिता जाहीर पाठिंबा दिला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, राहुल राजळे, विष्णुपंत अकोलकर, भिमराव फुंदे, रामकिसन काकडे, नंदकुमार शेळके, काकासाहेब शिंदे, दादाभाई चौधरी, अजय भंडारी, बंडू पठाडे, बंडूशेठ बोरुडे, महेश बोरुडे, मंगल कोकाटे, उध्दव माने, जगदीश काळे, प्रा.रमेश काटे, सुनिल ओव्हळ, शिवाजी मोहिते, बबन सबलस, नामदेव लबडे, संदीप एकशिंगे, संजय बोरुडे, अरुण कोकाटे, राजेंद्र साप्ते, अक्षय काळे, नितिन किर्तने, भगवान साठे, कुशिनाथ बर्डे, श्रीकांत मिसाळ, नारायण काकडे, अंकुश चितळे, वसंत पवार, नवनाथ चव्हाण, किशोर परदेशी, पांडूरंग काकडे, शिवनाथ मोरे आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना आ.राजळे म्हणाल्या की दसरा मेळाव्यात मराठा समाजाला आरक्षण देणारच अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी देऊन शपथ घेतली आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार मराठा आरक्षणाविषयी सकारात्मक असुन लवकरच या मराठा आरक्षणा विषयी चांगला निर्णय होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे यापुर्वी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने जशी शांततेच्या मार्गाने आंदोलने केली यापुढील काळातही त्याच पध्दतीने आंदोलने करावीत असे अवाहनही आ. राजळे यांनी यावेळी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या