दिंडोरी | Dindori
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
- Advertisement -
त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.
लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे. असे आमदार नरहरी झिरवाळ यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.
कालच करोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यामुळे त्यांनी स्वत:ला गृहस्थानबद्ध करून घेतले होते. यानंतर त्यांचा स्वब घेण्यात आला होता. आज या स्वबचा अहवाल प्राप्त झाला असून रिपोर्ट बाधित आढळून आला आहे.