Saturday, May 4, 2024
Homeनगरमहामार्गावर 467 जीव गेले अजून किती वाट पाहायची? - आ. लंके

महामार्गावर 467 जीव गेले अजून किती वाट पाहायची? – आ. लंके

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डीकरांशी माझे जिलव्हाळ्याचे नाते आहे. मोहटादेवी माझे श्रद्धास्थान आहे. मी जो प्रश्न हाती घेतो तो सोडवतो. संघर्ष माझा स्वभावच आहे. माझ्या पक्षाच्या मंत्र्यांनाही मी या रस्त्याचा प्रश्न विचारला होता.कल्याण – विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर 467 जीव गेले मग किती वाट पहायची? असा प्रश्न उपस्थित करत यामुळेच आपण उपोषण केल्याचे आ. निलेश लंके यांनी येथे सांगीतले.

- Advertisement -

अहमदनगर येथील उपोषण मागे घेतल्यानंतर देवराई येथे राष्ट्रीय महामार्गाचे सुरु झालेल्या कामाची पाहणी लंके यांनी केली. त्यानंतर पाथर्डीत आ.निलेश लंके यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. सवाद्य मिरवणुक काढली. स्व.वंसतराव नाईक यांच्या पुतळ्यााल पुष्पहार अर्पण केला. सराफ-सुवर्णकार संघटनेच्या वतीने येथील गणेशमंदीरात लंके यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना आ.लंके म्हणाले, मला लोकसभा निवडणुक लढवायची म्हणुन मी हे करतोय असा प्रचार काहीजण करीत आहेत. त्यांचे रस्त्याच्या कामासाठी काय योगदान आहे. नगर-शिर्डी रस्ता असेल, नगर-दौंड रस्ता असेल व पाथर्डी-नगर रस्ता असेल ही कामे तातडीने झाली पाहीजेत. मला शिर्डीत निवडणुक लढवायची नाही पण तेथील साईबाबां भक्तांना सुविधा मिळावी असे मला वाटते. काही लोक केवळ बोलघेवडे असतात. यावेळी किसन आव्हाड, अँड. हरीहर गर्जे, प्रतापराव ढाकणे, शिवशंकर राजळे, बंडुपाटील बोरुडे, रफिक सेख, क्षितीज घुले, पांडुरंग शिरसाट, नाशीरभाई शेख, चंद्रकांत भापकर, चांद मणियार, बाळासाहेब जिरेसाळ,राजेंद्र शेवाळे, सिताराम बोरुडे, अनिल ढाकणे, योगेश रासणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थीत होते.

म्हणुन उपोषण मागे

विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलुन हा प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली. म्हणुन उपोषण मागे घेतले. तसेच तडक काम सुरु झाल्याचे पहायला पाथर्डीला आलो.

- Advertisment -

ताज्या बातम्या