Saturday, April 26, 2025
Homeराजकीयकोणी काय केले हे बोलणे म्हणजे रडीचा डाव !

कोणी काय केले हे बोलणे म्हणजे रडीचा डाव !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पारनेर येथील कोविड सेंटरचा कार्यक्रम हा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत करण्यात आला आहे. कोण काय बोलते याला आम्ही महत्त्व देत नाही नाही.

- Advertisement -

काम करणार्‍यांनी इकडे-तिकडे लक्ष द्यायचे नसते. त्यामुळे मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. आरोग्यमंत्र्यांनी काय केले. स्थानिक आमदारांनी काय केले, असे बोलणे हा तर रडीचा डाव आहे, असल्याचे सांगत आ. निलेश लंके यांनी डॉ. खा. सुजय विखे टोला लगावला.

दरम्यान पारनेर येथील कार्यक्रमात शंभर टक्के सोशल डिस्टंसिंग पाळले गेले आहे. त्यामुळे कोणाच्या बोलण्याला काय महत्त्व द्यायचे. हे बाकीच्यांनी ठरवायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

खा. डॉ. विखे यांनी के.के. रेंजबाबत पारनेर व राहुरी येथे बैठक घेतल्या होत्या. त्यानंतर सोशल डिस्टंसिंगचे नियम व बैठकीत असलेल्या काही जणांनी मास्क घातले नसल्याचे फोटो समाज माध्यमात व्हरयरल झाले होते.

त्यावर बोलतांना खा. विखे यांनी कोविड सेंटरच्या उद्घाटनसाठी आलेल्या आरोग्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांवर देखील गुन्हे दाखल करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर काल आ. लंके यांना विचारले असता ते म्हणाल, कोविड सेंटरच्या उदघाटनच्या कार्यक्रमाच्या वेळी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले की नाही, हे त्यांना माहिती नाही.

आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळत कार्यक्रम केला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री त्याठिकाणी येतात. याचे आम्हाला भान होते. त्यामुळे एका तासात तो कार्यक्रम आम्ही उरकला. या कार्यक्रमात शंभर टक्के सोशल डिस्टंसिंग पाळले गेले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कोणाच्या बोलण्याला काय महत्त्व द्यायच. हे बाकीच्यांनी ठरवायचे.

आरोग्य मंत्र्यांच्या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी होते. या सर्वांना सत्य माहिती आहे. मुळात माझी एक सवय आहे. मी काम करणारा माणूस आहे. काम करीत असताना सरकारने ठरवून दिलेले नियम व अटींचे पालन आपण आपल्या पद्धतीने करायचे.

कोण काय बोलते, याला काही महत्त्व देण्यात अर्थ नाही. काम करणर्‍या माणसांनी इकडे-तिकडे लक्ष द्यायचे नसते. त्यामुळे मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. आरोग्यमंत्र्यांनी काय केले. स्थानिक आमदारांनी काय केले असे बोलणे हा तर रडीचा डाव असल्याचे सांगत आ.लंके यांनी खा. विखे यांना लगावला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...