Tuesday, September 17, 2024
Homeनगरत्यांचे हिंदुत्व ‘चायनीज मॉडेल’- आ. राणे

त्यांचे हिंदुत्व ‘चायनीज मॉडेल’- आ. राणे

रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ नगरमध्ये मोर्चा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

राज्यात हिंदुत्ववाद्यांचे सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडवट हिंदुत्ववादी आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदूहित संरक्षक आहेत. बाकीच्यांचे हिंदुत्व हे ‘चायनीज मॉडेल’ आहे, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली. महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ तसेच बांगलादेशमधील हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी ‘सकल हिंदू समाज’ यांच्यावतीने आ. राणे यांच्या नेतृत्वाखाली काल, रविवारी नगर शहरातून मोर्चा काढण्यात आला.

मोर्चाचा समारोप दिल्ली दरवाजा येथील सभेत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शहरातील शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरू झालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. भगवे झेंडे नाचवत ‘जय श्रीराम’ च्या घोषणा दिल्या जात होत्या. माळीवाडा वेस- पंचवीस चावडी- चौपाटी कारंजा- कापड बाजार, चितळे रस्ता मार्गे मोर्चा जात असताना दुकाने बंद केली जात होती व मोर्चा पुढे गेल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आली.

सभेत बोलताना आ. राणे म्हणाले, महंत रामगिरी महाराज काहीही चुकीचे बोललेले नाहीत. हिंदूंना आव्हान दिले जात आहे. आमच्यावर हल्ले होत आहेत. यासाठी कडवट हिंदूत्व हवे. महंतांचे वक्तव्य जिहाद्यांना आरसा दाखवणारे होते. महंतांकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍यांना आम्ही जिवंत ठेवणार नाही. हा देश हिंदूंचा असल्याने हिंदू हिताची भाषा केली जाणार. जी काही मस्ती करायची ती बांगलादेश, पाकिस्तानमध्ये जाऊन करा. महंतांचे समर्थन करणारे ‘स्टेटस’ समाज माध्यमांवर ठेवणार्‍यांना मारहाण होत आहे.

यासाठी हिंदूंचा दरारा व धाक निर्माण करण्याची गरज आहे. महंतांना संरक्षण देण्यास हिंदू समाज सक्षम असल्याचे राणे म्हणाले. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याने राजकारण सुरू आहे. कोणताही हिंदू त्याचे समर्थन करणार नाही. कारण छत्रपती आमचे आराध्य दैवत आहे. परंतु त्यांच्या नावावर राजकारण सुरू असल्याचेही राणे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या