Tuesday, March 25, 2025
Homeनगरमुलींनी लव्ह जिहादला बळी पडू नये; आ. नितेश राणे यांचे आवाहन

मुलींनी लव्ह जिहादला बळी पडू नये; आ. नितेश राणे यांचे आवाहन

श्रीरामपुरात महंत रामगिरी महाराज समर्थन रॅली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आपल्या मुलींनी लव्ह जिहादला बळी पडू नये, ज्या ठिकाणी छेडछाडीचे प्रकार होत असेल तेे त्याच ठिकाणी ठेचा, असे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले. शहरातील छत्रपती शिवाजी रोडवर सकल हिंदू समाज, राष्ट्रीय श्रीराम संघ, सकल वारकरी संप्रदाय यांच्यावतीने महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ व बांगला देशात होत असलेल्या हिंदू अत्याचाराच्याविरोधात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या जाहीर सभेत उपस्थितांना संबोधीत करताना ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग, नवनाथ महाराज म्हस्के, कृष्णानंद महाराज, बाळासाहेब महाराज रंजाळे, गणेश महाराज आदी प्रमुख उपस्थित होते.

- Advertisement -

आ. राणे म्हणाले की, लव्ह जिहादच्या नादी लागू नका, आपल्या भगिनींना फसवून त्यांचे आयुष्य खराब करत असतात. अशा जिहादला आपल्यातून फेकून द्या, हिंदू धर्म म्हणून आपण स्वाभिमानाने जगले पाहिजे. महंत रामगिरी महाराज काय चुकीचे बोलले, हे समजत नाही. त्यांच्या बुद्धिवादी लोकांनी सांगावे की, रामगिरी महाराज जे बोलले ते चुकीचे आहे. अशा वक्तव्यामुळे एवढ रान माजविण्याचे काहीच कारण नाही. या वक्तव्यामुळे रामगिरी महाराजांना युट्यूबवर धमक्या दिल्या जात आहेत. रामगिरी महाराज यांच्या केसालाही धक्का लावला तर… असा इशाराही आ. नितेश राणे यांनी दिला.
रामगिरी महाराज यांचे वक्तव्य मागे घेणार नाही.

हिंदू धर्म म्हणून रामगिरी महाराज यांच्या मागे उभे राहावे लागणार आहे. लहान लहान मुलांचे जे धर्मांतरण केले जात आहे, कोवळ्या वयात त्याला मारण्याची धमकी देत अजान, नमाज शिकविले जाते, हे किती भयाण आहे, असेही ते म्हणाले. यावेळी नवनाथ महाराज म्हस्के, सागर बेग आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी श्रीरामपूर तालुका, शहर तसेच तालुक्याबाहेरील हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. सूत्रसंचालन समीर माळवे यांनी केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...