Thursday, June 20, 2024
Homeनगरआमदार तनपुरे यांची कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेवर निवड

आमदार तनपुरे यांची कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेवर निवड

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

आमदार प्राजक्त तनपुरे यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर निवड करण्यात आली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांच्या 13 फेब्रुवारी 2023 च्या पत्रानुसार विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून ज्या तीन आमदारांची नियुक्ती करण्यात आली.

त्यामध्ये राहुरी तालुक्याचे आमदार माजी राज्यमंत्री व एक अभ्यासू आमदार म्हणून श्री प्राजक्त तनपुरे यांची कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी तालुक्याचे तत्कालीन आमदार प्रसाद तनपुरे यांनी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.त्यांच्या या निवडीमुळे विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागतील. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या