Sunday, May 26, 2024
Homeनगरना. राणेंविरोधातील गुन्हा मागे घ्या

ना. राणेंविरोधातील गुन्हा मागे घ्या

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या (BJP) अनेक वरिष्ठ नेत्यांवर आक्षेपार्ह विधाने केली तेव्हा मात्र भाजपने गुन्हे दाखल केले नाहीत परंतु महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) हे सरकार पोलीस व प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून राजकीय दहशतवाद निर्माण करीत असल्याचे मत भाजपचे ज्येष्ठ आ. राधाकृष्ण विखे पाटील (BJP MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, भाजप कार्यालयाची तोडफोड (Vandalism of BJP office) करणार्‍यांवर गुन्हे दाखल करावे यासह इतर मागण्यांचे निवेदन यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिर्डी (Shirdi) प्रांत कार्यालयासमोर आंदोलन (Movement) करण्यात आले. यावेळी आ. विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) प्रसारमाध्यमांपुढे बोलत होते.

आ. विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले की, सरकार विरोधी जनमताची भूमिका मांडणे तसेच आघाडी सरकारच्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार यावर बोलणार्‍यांची मुस्कटदाबी केली जात आहे. याची मोठी किंमत भविष्यात महाविकास आघाडी सरकारला मोजावी लागेल.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, रवींद्र गोंदकर, रवींद्र कोते, ताराचंद कोतेे, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, गणेशचे संचालक मधुकर कोते, कैलास सदाफळ, पोपट शिंदे, गणेश कोते, विकास गोंदकर, सोमराज कावळे, सुधीर शिंदे आदीसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, अ‍ॅड. रघुनाथ बोठे आदींनी आपले मत व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या