Friday, April 25, 2025
Homeजळगावआ.राजूमामा भोळेंनी घेतल्या बाजार समितीत भेटी

आ.राजूमामा भोळेंनी घेतल्या बाजार समितीत भेटी

जळगाव । प्रतिनिधी
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव येथे शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना व्यापारी,भाजी विक्रेते, घाऊक विक्रेते यांनी, तुमच्या पाठीशी असून विजयाची खात्री आ. राजूमामा भोळे यांना दिली.


प्रचार रॅलीत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पूर्ण परिसर आ. राजूमामा भोळे यांनी पिंजून काढला. रॅलीत सर्व व्यापारी वर्ग यांनी पुष्पहार घालून मिठाई भरवत आ. राजूमामा भोळे यांचे बाजार समितीमध्ये भरभरून स्वागत केले. प्रसंगी महायुतीच्या विविध घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीत आमदार राजूमामा भोळे यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. यावेळी एका महिला भगिनीने आ. राजूमामा भोळे यांना कानात विजयाची गोष्ट सांगून आश्वस्त केले. रॅलीमध्ये मंडळ क्रमांक 8 चे अध्यक्ष महादू सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, माजी नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, विनोद मराठे, संजय महाजन, अशोक राठी, हेमंत नेमाडे, भरत कर्डिले, भूषण लाडवंजारी, दिलीप लाडवंजारी, नितीन गायकवाड, अशोक कोष्टी, महेश पाटील, शिवसेनेचे कुंदन काळे, हर्षल मावळे, शोभाताई चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विनोद देशमुख, अर्चना कदम, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, आनंदा सपकाळे, पिरीप पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, अनिल अडकमोल उपस्थित होते.

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...