Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे गटाला धक्का! मराठा आरक्षणासाठी आमदार बोरनारे यांचा राजीनामा

शिंदे गटाला धक्का! मराठा आरक्षणासाठी आमदार बोरनारे यांचा राजीनामा

वैजापूर | प्रतिनिधी

वैजापूर गंगापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने समाजामधून तीव्र भावना आहे. या भावना लक्षात घेता मराठा आंदोलनाता जाहीर पाठिंबा देत रमेश बोरनारे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

- Advertisement -

यासंदर्भात आमदार रमेश बोरनारे यांनी विधानसभा अध्यक्ष (महाराष्ट्र राज्य विधानमंडळ विधानभवन मुंबई यांना पाठवलेल्या राजीनामापत्रात म्हटले की, सप्रेम जयमहाराष्ट्र असे की महाराष्ट्र राज्यामध्ये गेला अनेक वर्षांपासून मराठा समाज इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रमाणपत्र मागणीसाठी उपोषण व आंदोलन करीत आहे. परंतु त्यांना अद्यापपर्यंत इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रमाणपत्र मिळू शकले नाही. म्हणून मराठा समाजाच्या या संबंधी अंत्यत तीव्र भावना असून मराठा समाजाच्या या रास्त मागणीसाठी माझा मराठा समाजाच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा असून मी माझ्या विधानसभा सदस्य या पदाचा राजीनामा स्वखुशीने आपल्याकडे सुपूर्द करीत आहे.

प्रा. रमेश नानासाहेब पा. बोरनारे हे शिंदे गटाचे आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिदि पाँच कट्टर समर्थ म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. प्रा. बोरनारे यांचे समर्थकही स्थानिक स्वराज्य संस्थांवरील आपआपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या