Saturday, July 27, 2024
Homeनगरआ. पवारांच्या बारामती अ‍ॅग्रो कारखान्याच्या अडचणीत वाढ

आ. पवारांच्या बारामती अ‍ॅग्रो कारखान्याच्या अडचणीत वाढ

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

आमदार प्रा. राम शिंदे यांनी गाळप हंगाप वेळेआधी सुरू केल्याबाबात अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांवर सहकार मंत्री अतुल सावे यांनी उत्तर देताना या प्रकरणी आवश्यक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासह बारामती अ‍ॅग्रोसाखर कारखान्याच्या अडचणी वाढणार आहेत.

- Advertisement -

बारामती ग्रोने वेळेआधी ऊस गाळप हंगाम सुरू केल्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता. या प्रकरणात यापुर्वी एका अधिकार्‍याचे निलंबन झालेले आहे. कारखान्याच्या व्यवस्थापकांसह तसेच सूट दिलेल्या साखर आयुक्तांवर कारवाईची मागणी आमदार प्रा. राम शिंदे यांनी राज्याच्या साखर आयुक्तांकडे 19 ऑक्टोबर 2022 रोजी केली होती. या प्रकरणात साखर आयुक्तांनी चौकशी समिती लावली होती.

परंतू प्रथम चौकशी समितीने बारामती अ‍ॅग्रोला क्लिन चिट दिली होती. पुढे आमदार प्रा. राम शिंदे यांनी या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती.आमदार प्रा. राम शिंदे यांनी अजय देशमुख यांच्यावर कारवाई झाल्यानंतर बारामती ग्रो साखर कारखान्याविरुद्ध कारवाई व्हावी, हा मुद्दा सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला आहे.

यावर सहकार मंत्री अतुल सावे यांनी उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की, चौकशी अधिकारी अजय देशमुख यांनी चुकीचे अहवाल सादर केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य साखर कारखाने (क्षेत्र आरक्षण व गाळप आणि ऊस वितरण नियमन) आदेश 1984 मधील खंड 4 चा भंग झाला असल्याचे निदर्शनास आल्यामुळे बारामती अ‍ॅग्रो या कारखान्याविरुद्ध आवश्यक कारवाई करण्याबाबत राज्याच्या साखर आयुक्तांना कळविण्यात आले आहे असे म्हटले आहे.

विशेष लेखापरिक्षक झाले होते निलंबित

आमदार प्रा. राम शिंदे यांनी केलेल्या तक्रारीनंतर बारामती अ‍ॅग्रो प्रकरणात सरकारकडून सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीत प्रथम चौकशी अधिकारी विशेष लेखापरिक्षक अजय देशमुख हे दोषी आढळले होते. सरकारने देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. यावेळी सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या