Sunday, November 17, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यातील धार्मिक स्थळांबाबत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय

राज्यातील धार्मिक स्थळांबाबत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या.

- Advertisement -

जर कोणी एखादा निर्णय घेत लोकांच्या हितासाठी हट्ट करत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. आम्ही राजकारण करण्यासाठी हट्ट करत नाही. मात्र, भाजपवाले हे राजकीय पोळी भाजण्यासाठी काहीही करू शकतात, हे लोकांना कळतयं.

कधीतरी लोकांच्या हितासाठी एकत्र येऊन बघा, असा खोचक सल्ला राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना दिला. तसेच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री धार्मिक स्थळाबाबत निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर आ. पवार माध्यमांशी बोलत होते. करोनामुळे राज्यातील मंदिरे मार्च महिन्यापासून बंद आहेत. ही मंदिरे उघडण्यात यावी, यासाठी भाजपकडून उद्या आंदोलन करण्यात येत आहे.

या आंदोलनावर आ. पवार यांनी राज्यातील भाजप नेत्यांचा चांगला समाचार घेतला. मंदिराच्या अवतीभोवती जी दुकाने आहेत, जे अर्थकारण आहे, त्याचा विचार केला, तसेच धार्मिक भावनांच्या बाबतीत विचार केला, तर मंदिरे उघडावी, हे माझेही म्हणणे होते.

मी त्याच्यावरही बोललो होतो. पण आपली मंदिरे बघितली तर त्यांचा गाभारा लहान असतो, आणि भावनेच्या भरात तेथे लोकांची गर्दी वाढली, तर आरोग्याच्या अडचणी येऊ शकतात.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानूसार यूपीएससी व राज्य सरकारने एकमेकांमध्ये समन्वय साधत परीक्षा घ्याव्यात. त्या सप्टेंबरमध्ये न घेता स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, परीक्षा या टप्प्याटप्प्याने घ्यावेत असे न्यायालयाच्या निकालात म्हटले आहे.

काँग्रेस मधील काही आमदार नाराज असल्याचे समोर आले होते याबाबत आ. पवार यांना विचारले असता ते म्हणाले, महाविकास आघाडी होणे ही सोपी गोष्ट नव्हती. लोकांच्या हितासाठी तीन पक्ष एकत्र येण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे नाराजी ही थोडी फार असू शकते. तिनही पक्षातील नेते हे सक्षम असून सर्वमध्ये चर्चा देखील वेळोवेळी होत असते. त्यामुळे पुढे जाऊन या गोष्टींचा त्रास होणार नसल्याचे ते म्हणाले.

डॉ. खा. सुजय विखे यांनी आरोग्यमंत्र्यासहित कर्जत-जामखेड येथे उद्घाटन, भूमिपूजन करणार्‍यावर देखील गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली होती. याबाबत आ. पवार म्हणाले, कोणतीही बैठक घेत असतांना माझ्यासह त्यांनी सामाजिक अंतराचे नियम पाळणे गरजेचे आहे. कधी कधी लोक ऐकत नाही, कधी ऐकतात, कारण त्याची कामे असतात, असे आ. पवार म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या