Sunday, September 27, 2026
HomeनगरRahuri : विचार अन् पक्ष बदलणार्‍यांनी नीला विखेंकडून शिकावे - आ. रोहित...

Rahuri : विचार अन् पक्ष बदलणार्‍यांनी नीला विखेंकडून शिकावे – आ. रोहित पवार

स्वीडनच्या मुद्यावरून विखे पिता-पुत्रांवर नाव न घेता घणाघात

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

दुसर्‍या देशात जाऊन तेथील जनतेचा विश्वास संपादन करणे ही सोपी गोष्ट नाही. स्वीडनमध्ये यश मिळविणार्‍या नीला विखे यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. स्वीडनमध्ये माणुसकीला अधिक महत्त्व दिले जाते. आपल्याकडेही माणुसकी आहे; मात्र दुर्दैवाने सत्तेतील काही लोक माणुसकी बाजूला ठेवून जाती-धर्माच्या आधारावर राजकारण करीत आहेत. ‘आम्ही विचार बदलत नाही आणि पक्षही बदलत नाही’ हा विचार नीला विखे यांनी कोणाला दिला, हे वारंवार पक्षांतर करणार्‍यांनी आता तरी समजून घ्यावे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली.

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे आयोजित एका शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना आ. रोहित पवार बोलत होते. विखे पिता-पुत्रांनी काही वेळापूर्वी विरोधकांवर टीका करताना ‘काहींना स्वीडन कुठे आहे, हेही ठाऊक नाही’ असा टोला लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना आ. रोहित पवार यांनी नीला विखे यांच्या सामाजिक व राजकीय भूमिकेचा दाखला देत पक्षांतराच्या राजकारणावर भाष्य केले.

दुष्काळाच्या मुद्द्यावरूनही आ. पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. 5 ऑक्टोबरचा मुहूर्त काढणार्‍या सरकारला जनता व विरोधकांच्या दबावामुळे दहा दिवस आधीच पंचनामे सुरू करावे लागले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ‘सरसकट नुकसान’ मान्य केले असल्याने आता कोणतीही अट न घालता खर्चाच्या आधारे सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. कृषीमंत्र्यांच्या हातात शेतकर्‍यांना मदत करण्याचे अधिकार नसतील, तर त्यांनी स्वाभिमानाने पदाबाहेर पडून शेतकर्‍यांसाठी रस्त्यावर उतरावे, असे आव्हानही त्यांनी दिले. दरम्यान, एसआयआरमधील गोंधळाबाबत उद्या मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासह माहिती उघड करू, असा इशारा आ. रोहित पवार यांनी दिला. यावेळी त्यांनी निवडणूक आयुक्तांवरही टीका केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नगर जिल्ह्यात विदारक स्थिती

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar नगर जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अनेक भागात शेतीतून साधे पाणी वाहिले नाही. अपवाद वगळता अर्धातासापेक्षा अधिक काळ पाऊस झाला नाही....