Thursday, May 30, 2024
Homeनगरआमदार रोहित पवार यांची पंतप्रधानांच्या दौर्‍यावर टीका

आमदार रोहित पवार यांची पंतप्रधानांच्या दौर्‍यावर टीका

मुंबई | Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबईत आलेत आणि त्यामुळे आता लवकरच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (Mumbai Municipal Corporation Election) जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी उपरोधिक टीका (Critisum) राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी केली आहे.

- Advertisement -

उत्तर जिल्ह्याचे नामकरण साईनगरी करा; कोणी केली मागणी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दौर्‍यावर शिंदे फडणवीस सरकारवर विरोधक हल्लाबोल करत आहे. मविआने केलेल्या कामाचे श्रेय शिंदे-फडणवीस सरकार घेत आहे, अशी टीका (Critisum) महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आलेत आणि त्यामुळे आता लवकरच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

स्वत:च्या आई, पत्नी व मुलींना ठार मारणार होता, पुढे झाले असे काही…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दावोस मधून आले आहेत तर त्यांना मी विनंती करतो की, त्यांनी मोठे प्रकल्प राज्यात कसे येतील याकडे लक्ष्य द्यावं. नाशिक (Nashik), नागपूरमध्ये (Nagpur) उद्योग सुरू करावेत. तिथे संधी आहेत. तिथे विमानतळ आहेत. राज्यातील प्रकल्प दुसर्‍या राज्यात जाण्यापेक्षा हे दोन्ही प्रकल्प आपल्याकडे कसे देतील हे पाहावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी, असं ते म्हणाले आहेत.

..आणी जेवणाचा डबा देता देता राहिला; काय घडली घटना? तुकाई योजना प्रलंबित ठेवण्याचे पाप महाविकास आघाडीचे

- Advertisment -

ताज्या बातम्या