Saturday, May 18, 2024
Homeनगरआ. रोहित पवार यांचे आत्मक्लेश आंदोलन

आ. रोहित पवार यांचे आत्मक्लेश आंदोलन

पुणे |प्रतिनिधी| Pune

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा सतत होत असलेला अवमान हा महाराष्ट्रातील शिवभक्तांसाठी अत्यंत वेदनादायी आहे. महाराष्ट्राची अस्मिता तसेच थोरपुरुषांच्या विरोधात अपप्रचार करुन शेकडो वर्षाच्या सामाजिक परंपरेला तडा देण्याचे काम काही व्यक्तींकडून होत आहे. मात्र आमचे आदर्श असलेल्या थोरव्यक्तीसह महाराष्ट्राच्या अस्मितेविरोधात कोणी बोलल्यास आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा देत आमदार रोहित पवार व त्यांच्या समवेत आलेल्या राष्ट्रवादीचे आमदार व पदाधिकार्‍यांनी श्रीक्षेत्र वढु बुद्रुक येथे मौन धरून आत्मक्लेष आंदोलन केले.

- Advertisement -

छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आत्मक्लेश आंदोलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी आ. रोहित पवार यांच्यासह माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे, शिरूर-हवेलीचे आ. अ‍ॅड. अशोक पवार, आ. अमोल मिटकरी, आ. सुनिल टिंगरे आदी सहभागी झाले. यावेळी अधिक बोलताना आ. रोहित पवार म्हणाले, शंभूराजांनी शिवरायांचा आदर्श ठेवत मोठ्या शक्तिच्या विरोधात लढा दिला.

त्यांना झुकविण्याचा, विचारावर घाला घालण्याचा प्रयत्न करुनही ते कोणापुढेही झुकले नाही, हाच संदेश घेत पुढची ताकद कितीही मोठी असली तरी त्या ताकदीच्या समोर विचारांच्या ताकदीवर झूकायचं नाही. कोणीही महाराष्ट्राच्या अस्मितेला तडा देण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ज्यांचे पराक्रमी कर्तृत्व व त्यागामुळे आज आपण स्वाभिमानाने जगत आहोत, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही, अन्यथा भावी पिढीही आम्हाला माफ करणार नाही. अशी भुमिका अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या