Monday, May 27, 2024
Homeनगरवया ऐवजी विचारांवर बोलायला हवे होते

वया ऐवजी विचारांवर बोलायला हवे होते

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटी नंतर पक्षातीलच काही नेते शरद पवार यांचे वय वाढले आहे व आमदार रोहित पवार यांचे वय कमी आहे अशी चर्चा करत आहेत. पवार साहेबांच्या वयाची चर्चा अनेकांना खूप महामागत पडणार आहे. वयावर बोलण्याऐवजी विचारांवर बोलायला हवे होते. मी चांगल्या विचारांच्या सोबत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत येथे बोलताना सांगितले.

- Advertisement -

आज कर्जत येथे आमदार रोहित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली. राष्ट्रवादीच्या पक्ष फुटी नंतर रोहित पवार हे प्रथमच कर्जत येथे आले होते यामुळे त्यांना भेटण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आले होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली व शरद पवार व आमदार रोहित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत असे सांगितले.

यानंतर या ठिकाणी घडलेल्या घटनाक्रमाच्या संदर्भात संवाद आमदार रोहित पवार यांनी सर्व उपस्थित अशी साधला. यावेळी नामदेव राऊत, सूर्यकांत मोरे, बाळासाहेब साळुंखे, गुलाब तनपुरे, दीपक शेठ शिंदे, नितीन धांडे, सुनील शेलार, किरण पाटील, पोपटराव खोसे, उषा राऊत, प्रतिभा भैलूमे, ज्योती शेळके, स्वाती पाटील, प्रसाद ढोकरीकर, अ‍ॅड. सुरेश शिंदे, मोहनराव गोडसे, संतोष मेहत्रे, सतीश पाटील, देवा खरात, विशाल मेहत्रे, भास्कर भैलूमे, भाऊसाहेब तोरडमल, इक्बाल काझी, अंगद रुपनर, अरुण लाळगे, संजय लाळगे, श्री कोठारी, उमर कुरेशी यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की भारतीय जनता पक्षाचे सत्ता देशात व राज्यात कुठेही येणार नाही. भाजपा हा फडतूस पक्ष आहे. आगामी काळामध्ये त्यांना या सर्व प्रकाराची किंमत मोजावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या