Saturday, November 9, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदे कर्ण, फडणवीस अर्जून तर शरद पवार शकुनी मामा; कोणत्या नेत्याने...

एकनाथ शिंदे कर्ण, फडणवीस अर्जून तर शरद पवार शकुनी मामा; कोणत्या नेत्याने दिली उपमा..

मुंबई | Mumbai
महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. महायुतीतील नेते ठिकठिकाणी सभा घेत आहेत. यातच एका सभेत बोलताना विधान परिषदेतील आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल भाष्य केले आहे.

‘महाराष्ट्रच्या राजकारणातील कर्ण हे एकनाथ शिंदे तर अर्जुनाची भूमिका देवेंद्र फडणवीस बजावत आहेत. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिलेले पहिले आरक्षण शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी घालवले’. एकनाथ शिंदे नावाच्या वाघाने बंड केले. देवेंद्र फडणवीसांच्या साथीने महायुतीचे पुन्हा सरकार आणले. राज्य कसे चालवावे, याचा दुरदृष्टीपणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. परंतु, देवेंद्र फडणवीस यांना सर्वांनी घेरले आहे. कारण देवेंद्र फडणवीसच आपल्याला टफ-फाइट देऊ शकतात, हे शरद पवार यांना कळले आहे. त्यामुळेच वेगवेगळी आंदोलने आतापर्यंत राज्यात उभी करण्यात आल्याचा मोठा दावा सदाभाऊ खोत यांनी यावेळी बोलताना केला.

- Advertisement -

मराठा समाजाचे आत्तापर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. पण २०१९ साली मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी पहिले आरक्षण मिळवून दिले. पण शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला मिळालेले हे आरक्षण घालवले. मात्र या दोघांवर टीका झाली नाही , टीका झाली ती फडणवीस यांच्यावर. कारण प्रस्थापिताना धक्का देण्याचे काम फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे शरद पवार महाराष्ट्रच्या राजकारणाततील शकुनीमामा आहेत’ असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी यावेळी लगावला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या