Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्या"सत्तेतील आमदाराला जास्त निधी मिळतो हा..."; दानवे-भुमरे बाचाबाचीवर आमदार संजय शिरसाटांची तिखट...

“सत्तेतील आमदाराला जास्त निधी मिळतो हा…”; दानवे-भुमरे बाचाबाचीवर आमदार संजय शिरसाटांची तिखट प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये निधी वाटपाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यात जोरदार बाचाबाची झाली…

- Advertisement -

भर बैठकीत अंबादास दानवे आणि संदीपान भुमरेंमध्ये जुंपली, थेट अंगावर गेले धावून… VIDEO व्हायरल

विरोधीपक्षाच्या आमदारांना (MLA) कमी निधी दिला जातो असा आरोप दानवे यांनी केल्याने हा वाद झाला. यावर पालकमंत्री भुमरे यांनी प्रत्युत्तर दिले. मात्र, यावेळी अंबादास दानवे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेल्याने हा वाद आणखी वाढल्याचे पाहायला मिळाले. यावरून आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी दानवे यांना टोला लगावला आहे.

शिरसाट म्हणाले की, निधी वाटपात सत्ताधारी पक्षातील आमदारांना जादा निधी दिला जातो. हा अलिखीत नियम आहे. पूर्वी तुम्हाला जो निधी मिळत होता त्यामध्ये कमतरता झाली नाही मग आता तुम्हाला वाढीव निधी कशाला पाहिजे? असे शिरसाट यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधींची तब्बल १३६ दिवसांनंतर संसदेत दिमाखदार एन्ट्री; Video व्हायरल

पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, पालकमंत्री (Guardian Minister) सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तुम्ही आक्रमक व्हाल आणि अंगावर जालं, तर असे प्रकार कुणीच सहन करणार नाही. तसेच कन्नडच्या आमदाराने आरोप केला की, माझ्या मतदारसंघात एकही पैसा आला नाही. त्यानंतर पालकमंत्र्यांनी सांगितलं की, कलेक्टर यांच्याकडून तुम्हाला लेखी उत्तर मिळेल, तरीही त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, असेही शिरसाट यांनी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nana Patole : “कार्यकर्तेच नाही तर सामान्य लोकांच्या…”; मुख्यमंत्रीपदाबाबत नाना पटोलेंचे मोठे वक्तव्य

- Advertisment -

ताज्या बातम्या