Saturday, April 26, 2025
Homeधुळेआ. सत्यजीत तांबे म्हणतात...गेल्या दहा वर्षात राज्यात पाहीजे तसे उद्योग आलेच नाही

आ. सत्यजीत तांबे म्हणतात…गेल्या दहा वर्षात राज्यात पाहीजे तसे उद्योग आलेच नाही

धुळे । dhule प्रतिनिधी

आज घरोघरी डॉक्टर, इंजिनिअर, वकील आहेत. पंरतू त्यांना रोजगार नाही. त्यामुळे प्रामुख्याने रोजगारासह शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यावर भर दिला जाईल. आज मुंबई-दिल्ली कॅरीडॉर, महामार्ग, मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग अशी विकासाची कामे होत आहेत. त्याचा वापर करून नाशिक, धुळे, नंदुरबार-जळगावपर्यंत उद्योग, व्यापार पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. याबरोबरच स्थानिक लोकप्रतिधीची भेट घेवून चर्चा करून रोजगाराचा प्रश्न (question of employment) कसा सोडविता येईल, स्थानिकाला त्याच ठिकाणी कसा रोजगार मिळले, यासाठी प्रयत्न राहतील. विधान परिषदेच्या अधिवेशात पदवीधर, शिक्षकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करेल, अशी माहिती आज नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनियुक्त आ. सत्यजीत तांबे (MLA Satyajit Tambe) यांनी धुळ्यात पत्रपरिषदेत दिली.

- Advertisement -

पदवीधर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आ. तांबे यांनी आज पहिल्यांदाच धुळ्यात भेट दिली. यावेळी त्यांनी साक्री रोडवरील पत्रकार संघाच्या हॉलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. मला प्रचंड मताधिक्याने निवडणूक दिल्याबद्दल मी मालेगावपासून आभार दौरा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. आधी विभागात लाखोंच्या संख्येने पदवीधर आहेत. आधी स्थानिक प्रश्न समजुन घेणार असून ते शासन दरबारी मांडून सोडविण्याचे काम केले जाईल. विधानपरिषदेच्या अधिवेशात देखील हे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करेल, असेही त्यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रातील सर्वच प्रश्न सोडविण्यासाठी तीन दिवसीय राज्यस्तरीय शिक्षण परिषद देखील घेण्यात येणार आहे.

त्यात त्यात पुढील 25 वर्षाच्या शिक्षणाचा रोड मांडण्यात येईल. तसेच नुकतीच नाशिक येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स कार्यालयाला भेट दिली असून विभागात उद्योग, व्यापार कसा वाढविता येईल, याबाबत एक दिवसीय कार्यशाळा नाशिक येथे घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जुनी पेन्शन, विना अनुदानीत शिक्षण संस्था, विद्यार्थी शिष्यवृत्ती, शिक्षक भरती, जि.प.शाळेेच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन असे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केले जातील. खरे तर शिक्षक आणि आरोग्य या दोन विभागासाठी शासनाने पैशांचा विचार करू नये, मदत करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या दहा वर्षात राज्यात पाहीजे तसे उद्योग आलेच नाही

महाराष्ट्रात येणारे मोठे उद्योग गुजरातमध्ये गेले. पंरतू ते थांबविण्यासाठी किंवा परत येण्यासाठी सरकारचे प्रयत्न दिसून आले नाही. विलासराव देशमुख यांच्या सरकारनंतर गेल्या दहा वर्षात राज्यात पाहिजे तसेच उद्योग, व्यवसाय आले नाहीत. नवीन प्रकल्प यावेत यासाठी सरकारची तशी मानसिकता देखील दिसून आली नाही.

फॉक्सकॉन, वेंदांता सारखे उद्योग व त्याला लागून इतर लहान व्यवसाय आल्याशिवाय रोजगाराच प्रश्न सुटणार नाही. तसेच लघु उद्योगांकडे बघणे देखील काळाजी गरज आहे. त्यामुळे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी आ. सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

अपक्षच राहील…. पत्रपरिषदेत आ. तांबे यांनी राजकीय प्रश्नावर बोलणे टाळले. कोण काय म्हणत यावर मला राजकीय टीका टिपण्णी करण्याची गरज नाही. ती पदवीधरांचे प्रश्न समजुन घेण्यासाठी आलो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. असे सांगताच पत्रकारांशी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मी अपक्ष म्हणून निवडणूक आला. अपक्ष म्हणूनच काल शपथ घेतली. त्यामुळे अपक्षच राहील, असेही त्यांनी सांगितले.

आ. सत्यजीत तांबे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पहलगाम

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याप्रकरणी TRF संघटनेचा घुमजाव; आधी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले. तर जे स्थानिक मदतीसाठी धावले, त्यांनाही...