Monday, July 22, 2024
Homeजळगावआ.शहाजीबापू पाटील सांगतात : आणि यानंतर अखेर एकनाथ शिंदेंनी धाडस केलं

आ.शहाजीबापू पाटील सांगतात : आणि यानंतर अखेर एकनाथ शिंदेंनी धाडस केलं

जळगाव jalgaon

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress leader) सर्व निधी, (funds,) योजना आणि कामं पळवली (ran away) त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांना भेटून सांगितले काही तरी निर्णय घ्या. मग त्यांनी निर्णय घेतला, असे मत काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल” फेम आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) यांनी व्यक्त करत विरोधी पक्षनेते (Leader of Opposition) व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांवर ( Ajit Pawar) जोरदार टीका (Strong criticism) केली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विविध कारणांमुळे ‘मातोश्री’वर थांबायचे पण अजित पवार पहाटेच मंत्रालयात यायचे, अशी टीका शहाजीबापू पाटलांनी केली आहे. ते मुक्ताईनगरातील जाहीर सभेत बोलत होते.

शहाजीबापू पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढच्या अडीच वर्षात आम्हाला चांगला अनुभव आला नाही. वेगवेगळ्या कारणांसाठी उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वर थांबायचे.

अजित पवार पहाटेच मंत्रालयात येऊन बसायचा. अकरा वाजता मंत्रालय उघडायचं आणि हा बाबा सकाळी साडे सातलाच मंत्रालयात येऊन बसायचा. या काळात राष्ट्रवादीने सगळा निधी नेला, त्यांनी सगळी कामं नेली, सगळ्या योजना नेल्या.

महाविकास आघाडी सरकारमधील खदखद बोलून दाखवताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत सर्व काही ठीक होतं. महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार स्थापन होणार होतं. पण अचानक आम्हाला एका हॉटेलमध्ये बोलवण्यात आलं. तिथे एक आठवडाभर आम्हाला ठेवलं. तेथून दुसऱ्या हॉटेलमध्ये नेलं तिथेही आठवडाभर ठेवलं. मग तिसऱ्या हॉटेलमध्ये नेलं, शाळेतली पोरंसुद्धा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात नाहीत, तसे त्यांनी आमदारांना पळवलं.

त्यामुळे आम्हालाच वाटायला लागलं की, आम्ही आमदार आहोत की कोण आहोत? कुणी पण उचलतंय आणि कुठेपण घेऊन जातंय. या सर्व घडामोडीनंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हे समजल्यावर आम्ही सगळ्या ५६ आमदारांनी आनंदाने ही बाब मान्य केली, असंही ते म्हणाले.

आम्ही मात्र मुख्यमंत्र्यांचे आमदार म्हणून मंत्रालयाच्या परिसरात तोंड बारीक करून हिंडत बसायचो. याच एका कारणासाठी आम्ही ५० आमदारांनी ठरवून एकनाथ शिंदेना सांगितलं, काहीतरी निर्णय घ्या. अन्यथा येणारी विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक एवढी सोपी राहणार नाही. आपल्याला राष्ट्रवादीनं निम्मं गिळलं आहे, बाकीचं गिळल्याशिवाय राष्ट्रवादी शांत बसणार नाही. यानंतर अखेर एकनाथ शिंदेंनी धाडस केलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या