Saturday, June 15, 2024
HomeनाशिकDindori Loksabha2024 : भुजबळांकडून 'तुतारी'चा प्रचार, मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; आमदार कांदेंची मागणी

Dindori Loksabha2024 : भुजबळांकडून ‘तुतारी’चा प्रचार, मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; आमदार कांदेंची मागणी

नाशिक | Nashik

- Advertisement -

सध्या लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) धामधूम सुरु असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून जोरदार प्रचार चालू आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा (Dindori Loksabha) मतदारसंघात देखील महायुतीमधील घटक पक्षांकडून युतीच्या उमेदवार डॉ. भारती पवारांचा (Dr.Bharati Pawar) प्रचार सुरु आहे. मात्र, अशातच आता प्रचारावरून महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांच्यावर ते महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांचा प्रचार करत नसल्याचा आरोप करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हे देखील वाचा : अजित पवारांनी बोलून दाखवली मनातील खंत; म्हणाले, मी शरद पवारांचा मुलगा असतो तर…

दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांच्या निवासस्थानी पार पडला. यावेळी बोलतांना त्यांनी “भुजबळ महायुतीचा धर्म पाळत नसून दिंडोरी लोकसभेतील नांदगावमध्ये (Nandgaon) ते ‘तुतारी’ चिन्हाचा प्रचार करत असल्याचा आरोप केला. तसेच भुजबळांनी मंत्रीपद महायुतीकडून घ्यायचे आणि प्रचार व प्रसार मात्र महायुतीचा धर्म न पाळता तुतारीचा करायचा. तुम्हाला तुतारीचा एवढा जर पुळका असेल तर त्यांनी महायुतीकडून मिळालेल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि खुशाल ‘तुतारी’चा प्रचार करावा”, असं कांदेंनी म्हटले.

हे देखील वाचा : Nashik News : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी काढली थेट तडीपारीची नोटीस

पुढे बोलतांना कांदे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) जाणून बुजून ‘तुतारी’चा प्रचार करत असून त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. काल बुधवार (दि.०८) रोजी जेवढे राष्ट्रवादीचे नेते तुतारीचा प्रचार करत होते, त्यांचे फोटो आणि व्हिडीओ माझ्याकडे आहेत. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना महायुतीमधून मंत्रीपद मिळाले आहे आणि ते काम मात्र तुतारीचं करत आहेत. जर हे भाजपचेही नेते शांतपणे पाहत असतील तर हे दुर्दैव आहे”, अशी टीकाही सुहास कांदे यांनी केली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘त्या’ युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या

दरम्यान, आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपांवर बोलतांना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, “जर कुठल्या कार्यकर्त्याचे आमदारांसोबत पटत नसेल तर त्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा (Mahayuti) प्रचार करावा. आपले फलक लावावे, पंरतु, प्रचार मात्र महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांचाच करावा,” असं त्यांनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या