Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMLA Suresh Dhas : "मी जिवंत राहील किंवा…"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर आमदार...

MLA Suresh Dhas : “मी जिवंत राहील किंवा…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर आमदार धसांची तुफान टोलेबाजी

बीड | Beed

भाजप आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यानंतर आयोजित भाषणात बोलतांना आमदार धस यांनी तुफान टोलेबाजी केली.

- Advertisement -

यावेळी बोलतांना आमदार धस म्हणाले की,”आपण सभागृहात म्हणाले होते की सुरेश धस तुम्हाला ३०० कोटी रुपये दिले आणि तुम्ही ते लगेच देऊन पण टाकले. आम्हाला दुसऱ्या कोणाकडून काहीच अपेक्षा नाही. कारण, फक्त देवेंद्र बाहुबलीच आम्हाला ते देऊ शकतात. मी तुमचा लाडका असून ३.५७ टीएमसी पाणी शिरुर आणि पाटोदा तालुक्याला (Shirur and Patoda Taluka) जायकवाडीमधून द्या. तुमच्याकडूनच आम्हाला अपेक्षा असून ही योजना मंजूर झाल्यास मी जिवंत राहिल किंवा नाही, पण या मतदारसंघातून भाजपचाच आमदार (MLA) राहील, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की,” मी बोललो की काहीजण म्हणतात बीड जिल्ह्याची (Beed District) बदनामी होत आहे. या जिल्ह्याने क्रांतीसिंह नाना पाटील आणि बबनराव ढाकणे यांना निवडून दिले. प्रमोद महाजन यांच्यासारखा उंचाचा आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या एवढा पहाडासारखा माणूस दिला. आज ज्या जमिनीवर या कामाचा शुभारंभहोऊन जो प्रकल्प उभा राहत आहे ती जमीन रक्षा विभागाकडे जाणार होती, पण जॉर्ज फर्नाडीस हे रक्षामंत्री होते. मुंडे साहेबांनी ही जमीन सोडवून घेतली असे म्हणत आमदार सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडेंचे योगदान सांगितले.

दरम्यान, या खुंटेफळ तलावामुळे (Khuntefal Lake) ३० गावांमधील तब्बल ८० हजार एकर ओलिताखाली येणार आहे. २८०० कोटी रुपयांच्या महत्वकांक्षी प्रकल्पातून (Project) स्थानिक शेतकऱ्यांना (Farmer) मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...