Thursday, January 16, 2025
Homeनगरउद्यापासून आ. तांबे यांच्या उपस्थितीत सह्याची मोहीम

उद्यापासून आ. तांबे यांच्या उपस्थितीत सह्याची मोहीम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेतकरी आणि कामगार यांच्याबाबत केंद्राने केलेल्या अन्यायकारक कायद्याच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने

- Advertisement -

राज्यभर मोहीम उघडण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरून नगरमध्ये शहरातील कामगारांच्या सह्यांच्या मोहिमेचा शुभारंभ आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवारी होणार असल्याची माहिती शहर काँग्रेसने दिली आहे.

कामगारविरोधी कायद्यांमुळे कामगारांवर कुर्‍हाड कोसळली आहे. कामगार वर्गामध्ये या धोरणाबाबत नकारात्मक भावना आहे. त्यामुळे नगर शहरातील कामगारांचा आवाज बनत शहर जिल्हा काँग्रेस कामगारांच्या सह्यांचे निवेदन गोळा करून ते प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून केंद्र सरकारला पाठवणार आहे.

उद्या सकाळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये हा शुभारंभ होईल. त्यानंतर दुपारी 2.00 वाजता नगर तालुका, पारनेर, पाथर्डी व शेवगाव तालुक्याच्या तालुकाध्यक्ष, तसेच जिल्हा कार्यकारिणीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक आ.तांबे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे.

या बैठकीमध्ये शेतकर्‍यांच्या सह्यांच्या मोहिमेचे नियोजन आ. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी दिली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या