Wednesday, April 30, 2025
Homeनगरसमतेचा संदेश देणारा प्रबोधनकार काळाच्या पडद्याआड - आ. विखे

समतेचा संदेश देणारा प्रबोधनकार काळाच्या पडद्याआड – आ. विखे

लोणी |वार्ताहर| Loni

कैकाडी महाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समतेचा संदेश देणारा समाज प्रबोधनकार काळाच्या पडद्या आड गेला.

- Advertisement -

असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

कैकाडी महाराज आणि प्रवरा परिवाराचा ॠणानुबंध खूप वर्षांचा होता. पद्मभूषण खासदार आणि कैकाडी महाराजांची सामाजिक प्रश्नांवरची मत खूप ठाम होती.जातीपातीच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करणारे वारकरी संप्रदायातील एक आदराचे व्यक्तिमत्त्व म्हणून महाराजांची ओळख संपूर्ण आध्यात्मिक क्षेत्रात होती.

प्रवरा परिवाराने आयोजित केलेल्या धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमास कैकाडी महाराजांची राहिलेली उपस्थिती हा आमच्यासाठी आठवणींचा ठेवाच आहे. विधान परिषदेचे सभापती मा.रामराजे निंबाळकर आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या उपस्थितीत कैकाडी महाराजांना पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय समाजप्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्याची प्रवरा परिवाराला मिळालेली संधी स्मरणात राहणारी असल्याचे आ.विखे पाटील यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘प्रवरे’च्या आजी-माजी संचालकांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात साडेआठ कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी आजी-माजी संचालक, साखर आयुक्त पुणे, संबंधित दोन...