Sunday, December 15, 2024
HomeनाशिकNashik-Dindori Constituency 2024 : उमेदवारांसह आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क

Nashik-Dindori Constituency 2024 : उमेदवारांसह आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क

मंत्री भुजबळ आणि भुसेंनीही केले मतदान

नाशिक | Nashik

राज्यभरात आज पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत असून सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विविध मतदान केंद्रांवर मतदार मोठ्या उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे.मतदारांसोबतच उमेदवार आणि आमदारांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यात नाशिक आणि दिंडोरीतील उमेदवारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

- Advertisement -

नाशिक लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सिन्नरमधील भाटवाडी मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदान केले. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगी देखील उपस्थित होती.

नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनीही त्र्यंबकेश्वर येथील मविप्र महाविद्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.


राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक शहरातील मॉर्डन स्कूल, सिडको या मतदान केंद्रावर जाऊन आपल्या कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मंत्री भुजबळ यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, डॉ.शेफाली भुजबळ, समीर भुजबळ यांच्या मातोश्री हिराबाई भुजबळ यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी मतदान केले.

महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांनीही दिंडोरी तालुक्यातील गोंडेगाव येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी कळवण तालुक्यातील दळवट येथील मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदान केले. याशिवाय निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच भाजप नेते डॉ. तुषार शेवाळे यांनीही आपले मतदान केले.

नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांनीही शहरातील बॉईज टाऊन हायस्कूलच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सोयगाव येथील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनीही मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या