Tuesday, October 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar : "इंदापुरात जो कार्यक्रम झाला तोच फलटणमध्ये"; भाजपनंतर आता शरद...

Sharad Pawar : “इंदापुरात जो कार्यक्रम झाला तोच फलटणमध्ये”; भाजपनंतर आता शरद पवार अजितदादांना धक्का देणार

मुंबई | Mumbai

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) नवीन पक्ष आणि चिन्हासह लढूनही राज्यात सर्वाधिक स्ट्राईक रेट राखणाऱ्या शरद पवारांनी (Sharad Pawar) आता विधानसभा निवडणुकीसाठी एकापाठोपाठ एक डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. आधी कोल्हापूर, मग इंदापूर, यानंतर आता शरद पवार फलटणमध्ये मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे, याचे संकेत दस्तुरखुद्द शरद पवारांनी दिले आहेत. आज सोमवार (दि.०७ ऑक्टोबर) रोजी इंदापुरात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश झाला. या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी रामराजे नाईक निंबाळकरांचे नाव न घेता फलटणमध्येही पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे, असे म्हणत त्यांच्या प्रवेशाची तारीख जाहीर केली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Political Special : खोसकरांची जाळीवर उडी यशस्वी ठरेल का?

यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की,”आज हा कार्यक्रम झाला. निघायच्या वेळेला कुठून तरी फोन आला आणि त्यांनी हट्ट केला, यावेळी इंदापुरला (Indapur) चालला आहात. १४ तारखेला आमच्याकडे आलेच पाहिजे. म्हटलं काय कार्यक्रम आहे? तर म्हणे, इंदापुरला आहे तोच आमच्याकडे आहे. विचारलं कुठे? तर म्हणे फलटणला असे शरद पवारांनी म्हटले. यानंतर हसतच त्यांनी उपस्थितांना प्रश्न केला “समजलं का?” त्यानंतर कार्यकर्त्यांनी (Worker) टाळ्यांचा कडकडाट केला.

हे देखील वाचा : Political Special : नाशकात मिसळ पार्ट्यांचा जोर

पुढे बोलताना पवार म्हणाले की, “फलटण (Phaltan) झाल्यानंतर जवळपास एक महिन्याचे दिवस बुक झाले आहेत. मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनात निर्णय आहे की, एकत्र आले पाहिजे,परिवर्तन झाले पाहिजे. महाराष्ट्रातील चित्र वेगळं आहे, संपूर्ण देशाला दाखवले पाहिजे. ती दाखवण्याची संधी आज महाराष्ट्रात (Maharashtra) आलेली आहे”, असे शरद पवारांनी उपस्थितांना सांगितले.

हे देखील वाचा : अखेर हर्षवर्धन पाटलांच्या हाती ‘तुतारी’! इंदापूरातून उमेदवारीही जवळपास निश्चित

दरम्यान, विधानपरिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत (Ajit Pawar) गेले आहेत. त्यांची महायुतीत आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार आहे. ते सध्या अजित पवार गटात नाराज आहे. फलटणमध्ये निंबाळकरांची मोठी ताकद आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यात राजकीय भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे निंबाळकर लवकरच हाती तुतारी घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या