Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजअमोल मिटकरींची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडली, व्हिडिओ आला समोर

अमोल मिटकरींची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडली, व्हिडिओ आला समोर

अकोला | Akola

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

- Advertisement -

मनसे कार्यकर्त्यांनी (MNS Workers) अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मिटकरी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अकोल्यात (Akole) हा प्रकार घडला.

दरम्यान या प्रकरणानंतर अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्याला मी भीक घालत नाही, अशी प्रतिक्रियाही अमोल मिटकरी यांनी दिली. महाराष्ट्राचं नाव घेतात आणि अशाप्रकारे गुंडागर्दी करतात. हा भेकड हल्ला आहे. या हल्ल्यांना मी घाबरत नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले. या हल्ल्यावेळी मी विश्रामगृहात होतो. काही जण मला भेटायला आले होते. त्यासाठी मी येथे आलो होतो. मनसेच्या कार्यकर्त्याने हा हल्ला केला. मी याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

हे देखील वाचा : हावडा-मुंबई एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्याने भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी

नेमकं प्रकरण काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे (Pune) दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करत नागरिकांची विचारपूस केली होती. यावेळी त्यांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका केली होती. अजितदादा पुण्याचे पालकमंत्री असताना धरणातून इतकं पाणी आलं, अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरेंनी केली होती.

हे देखील वाचा : Kerala Landslide News : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन; ११ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

त्यावर प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी म्हणाले की, सुपारीबहाद्दरांनी बोलू नये. कारण हे सुपारीबहाद्दर टोल नाक्याचे आंदोलन असेल, भोंग्याचे आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करु शकले नाहीत. राजकारणात महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकोल्या दाखवण्यासारखा आहे.

यासोबच ते पुढे म्हणाले की, सुपारीबहाद्दर लोकांकडून जनतेनं योग्य तो धडा घेतलेला आहे. नव्या नवरीचे नऊ दिवस म्हणून कुठेतरी पुण्यात भेट द्यायची. ज्या व्यक्तीला एनडीआरएफचा लाँग फॉर्म माहित नाही. तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनेवर बोलतो आहे. म्हणजे मला असं वाटते अलिकडच्या काळातील राजकारणातला हा सर्वात मोठा जोक आहे. असे अमोल मिटकरी म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या