Saturday, June 15, 2024
HomeनाशिकNashik News : जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला मनसेचे 'जोडे मारो'

Nashik News : जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला मनसेचे ‘जोडे मारो’

नाशिक | Nashik

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) राजगड (Rajgad) येथील कार्यालयासमोर गुरुवारी (दि.३०) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन केले. यावेळी आव्हाड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

काल आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी महाड (Mahad) येथील चवदार तळे परिसरात मनुस्मृती दहन केले. यावेळी त्यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला गेला. त्यानंतर सत्ताधारी भाजपसह (BJP) महायुतीमधील घटक पक्षांनी राज्यभर आव्हाडांचा निषेध करत केला. या पार्श्वभूमीवर आज नाशकातील राजगड कार्यालयासमोर मनसेकडून आव्हाडांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, यावेळी मनसेचे विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, बंटी लभडे, धीरज भोसले, साहेबराव खर्जुल, नितीन माळी,भाऊसाहेब निमसे, अमित गांगुर्डे ,राकेश परदेसी, प्रफुल बनबैरू, ललित वाघ, मेघराज नवले, किशोर वडजे, धरम गोविंद, प्रवीण अहिरे, लक्ष्मण साळवे, प्रवीण अहिरे, रागिनी कोदे, मुक्ता इंगळे यांच्यासह आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या