Wednesday, July 24, 2024
Homeमहाराष्ट्रMaratha Andolan: मराठा मोर्चावरील लाठीचार्जवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, ही...

Maratha Andolan: मराठा मोर्चावरील लाठीचार्जवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे…

मुंबई | Mumbai

- Advertisement -

“जालना जिल्ह्यातील (Jalana) अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण (Marataha Reservation) मिळावे म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला (Lathi Charge On Protestors) आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

राज ठाकरे म्हणाले,”जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो,” असे राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Maratha Andolan : लाठीचार्ज केला, गोळ्या झाडल्या.. हे दहशतवादी आहेत का?; छत्रपती संभाजीराजेंचा संताप

“ह्या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे, आणि ह्या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलने केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणले तसे की, ती आंदोलने, मोर्चे ह्याचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती”.

“अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असे घडणार होते की प्रशासनाने असे टोकाचे पाऊल उचलले? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतेच चुकीचे पाऊल नसते टाकले. त्यामुळे इथे सरकारचे चुकले हे निश्चित”, असे म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

“राहता राहिला प्रश्न ह्या संवेदनशील विषयाचा, तर ह्याला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणे खरेच शक्य आहे का? ते न्यायालयात टिकेल का? बरं आरक्षण देऊन मराठा समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत? त्या जोडीला ह्या समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घौडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल ह्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का?” असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

चंद्रानंतर आता ‘इस्रो’चा ‘सूर्य नमस्कार’! ‘आदित्य एल१’चं आज प्रक्षेपण; नेमकं काय साध्य होणार? जाणून घ्या सविस्तर

“मुळात हा प्रश्न फक्त मराठा समाजाच्या आरक्षणापुरता नाहीये, तर एकूणच मराठी तरुण-तरुणींच्या रोजगाराशी संबंधित आहे. साध्या तलाठी भरतीसाठी जर लाखभर अर्ज येत असतील आणि भरती अवघ्या शेकड्यात होणार असेल, तर मराठी मुलांच्या मनात काय धुमसतंय ह्याचा विचार करावा लागेल. शिकलीसवरलेली मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत, हे चित्रं चांगलं नाही”, अशी खंतही राज ठाकरेंनी बोलून दाखवली.

“उगाच भूलथापा देणे किंवा एकमेकांवर आरोप करून स्वतःची मान काढून घेणे ह्या दोन्ही गोष्टी आधीच्यांनी आणि आत्ताच्यानी करू नयेत. काल जे घडले त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडले, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचे विस्कटलेले राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे”, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

“आरक्षणावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणे आणि ते पाडून दुसरे सरकार आणणे, ह्यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल असे आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे. माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की ह्या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका”, असे आवाहन राज ठाकरे यांनी आंदोलकांना केले.

“तुम्ही आंदोलने आणि मोर्च्यांचा आदर्श घालून दिला आहेत, तो खरेच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही ह्याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि ह्यापुढे पण राहील”, असेही राज ठाकरे म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या