मुंबई | Mumbai
लोकसभा निवडणुकीला (Loksabha Election) महायुतीला पाठींबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेसाठी (Vidhansabha) स्वबळाचा नारा दिला आहे. आज (गुरुवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी मेळाव्यात राज ठाकरेंनी मनसे (MNS) आगामी विधानसभेला २२५ ते २५० जागा लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी राज ठाकरेंनी राज्यात सरकारने सुरु केलेल्या ‘लाडकी बहीण’ आणि ‘लाडका भाऊ’ योजनेवरुन निशाणा साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना टोला लगावला.
हे देखील वाचा : राज ठाकरेंचा विधानसभेसाठी स्वबळाचा नारा; ‘इतक्या’ जागा लढवणार
यावेळी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या कार्यक्रमासाठी अमेरिका (America) दौऱ्यावरुन परतल्याचे सांगताना पाश्चिमात्य देशांमध्ये कशाप्रकारे छोट्याछोट्या गोष्टींचा विचार केला जातो हे टॉयलेट पेपरचे उदाहरण देत सांगितले. आपल्याकडे दरवेळेस पाऊस (Rain) पडत नसला की चिंता व्यक्त केली जाते. मात्र पाण्याचा वापर काळजीपूर्वक केला जात नाही असे पाश्चिमात्य आणि आपल्याकडे वापरल्या जाणाऱ्या टॉयलेटमधील पाण्याच्या प्रमाणाचा संदर्भ त्यांनी दिला.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : “माझ्याविरोधातील व्हिडीओ क्लिप जाहीर करा”; अनिल देशमुखांचे फडणवीसांना चॅलेंज
त्यानंतर हाच संदर्भ देत भारतामध्ये (India) मात्र लोकांच्या प्रश्नावर बोलायला सरकारला वेळ नाही असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. याच संदर्भावरून त्यांनी राज्य सरकारने (State Government) आणलेल्या ‘लाडकी बहीण आणि लाडका भाऊ’ योजनेवरुन टोला लगावला. ते म्हणाले की, “पाणी, आरोग्य, नोकरीच्या प्रश्नांवर, विषयांवर बोलायला आपल्याकडे वेळ नाही. आपल्याकडे काय सुरु आहे, ‘लाडकी बहीण’, ‘लाडका भाऊ’,आहो, ‘लाडकी बहीण’ आणि ‘लाडका भाऊ’ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. त्याच्यासाठी योजना कशाला राबवायची?” असा टोला राज यांनी लगावला.
हे देखील वाचा : पुण्यात पावसाचा हाहाकार; अनेकांच्या घरांत शिरलं पाणी, नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू बोटी मागवल्या
तसेच “बहिणीला दीड हजार रुपये देणार, यासाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत का?, रस्त्यावरचे खड्डे बुजवायला सरकारकडे पैसे नाहीत, असे म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारला टोला लगावला. तसेच महाराष्ट्रातील मूळ प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हेच येणाऱ्या विधानसभेत तुमचा प्रचार आणि पक्षाचे कॅम्पेन असले पाहिजे,” असेही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा