Saturday, May 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजजिथे व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, त्याच ठिकाणी राज ठाकरे मराठी बांधवांशी संवाद साधणार;...

जिथे व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, त्याच ठिकाणी राज ठाकरे मराठी बांधवांशी संवाद साधणार; ‘या’ तारखेला मिरा भाईंदरला भेट देणार

मुंबई | Mumbai
मराठीच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी मिरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी विराट स्वरुपाचा मोर्चा काढला होता. मराठी शिकणार नाही असे सांगत मारहाण करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक करा अशी मागणी केली होती. या मुद्द्यावरुन व्यापार्ऱ्यांना मोर्चाला परवानगी दिली होती. प्रशासनाने देखील अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी दिली. मात्र प्रत्युत्तरादाखल मराठी मोर्चाला पहिल्यांदा परवानगी नाकारली. पण मराठीच्या रेट्यापुढे अखेर पोलीस प्रशासनाला एक पाऊल मागे येऊन मराठी मोर्चाला परवानगी द्यावी लागली. मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि मराठी एकीकरण समितीने हा मोर्चा काढला होता. दरम्यान, आता याच मुद्द्यावरुन मोठी अपडेट येत असून खुद्द राज ठाकरे ज्या ठिकाणी व्यापार्ऱ्यांनी मोर्चा काढला त्याच ठिकाणी राज ठाकरे मराठी बांधवांशी संवाद साधणार आहे.

- Advertisement -

अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून ८ जुलै रोजी मिरा-भाईंदरमध्ये मनसेने मोर्चा काढला होता. या मोर्चाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने लोक मनसेच्या या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर आता १८ जुलै रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे हे मिरा रोडा येथे सभा घेणार आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची सभा किंवा रॅली काढण्याची पक्ष पातळीवर रणनीती सुरू असल्याचे कळते.

राज ठाकरे १८ जुलै रोजी मिरारोड येथे जातील. मिरा रोड येथेच मोठी सभा घेऊन ⁠मराठी मोर्चा आणि घडलेल्या प्रकारावर राज ठाकरे बोलतील. मराठी मोर्चाला परवानगी नाकारणारे पोलीस आयुक्त आणि त्यानंकर मराठीच्या रेट्यापुढे प्रकरण अंगलट आल्यानंतर शासनाने नमते घेऊन परवानगी द्यायला लावल्याच्या घटनेवर राज ठाकरे खास ठाकरी शैलीत भाष्य करतील, असे कळते.

मिरा भाईंदरमध्ये मनसेच्या वतीनं मराठीच्या मुद्यावरुन मोर्चा काढण्यात आला होता. तो मोर्चा आयोजित होऊ नये म्हणून मनसेच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...