Tuesday, January 6, 2026
Homeमुख्य बातम्याRaj Thackeray : गुन्हा कबूल आहे का? न्यायालयाचा सवाल; राज ठाकरेंचे अवघ्या...

Raj Thackeray : गुन्हा कबूल आहे का? न्यायालयाचा सवाल; राज ठाकरेंचे अवघ्या चार शब्दात उत्तर; म्हणाले, “मला…”

मुंबई | Mumbai

२००८ मध्ये रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी (MNS Workers) मारहाण करत रेल्वेचे मोठे नुकसान केले होते. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आज (गुरुवार) ठाणे न्यायालयात सुनावणी झाली असता न्यायालयाने राज ठाकरेंना एक महिन्याची डेडलाईन देत तुम्ही सहकार्य करा, हे प्रकरण लवकर संपेल,असे म्हटले आहे. आजच्या सुनावणीसाठी राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर झाले होते.

- Advertisement -

रेल्वे भरती बोर्ड परीक्षा (Railway Recruitment Board Exam) संबंधित मारहाण आणि प्रक्षोभक भाषणाच्या प्रकरणी ही सुनावणी न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांच्या दालनात पार पडली. कल्याण कोर्टात दाखल झालेला हा खटला आता ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टात हस्तांतरित करण्यात आला आहे. यावेळी राज ठाकरे यांच्यासह या प्रकरणात नितीन देसाई, अभिजीत पानसे, अविनाश जाधव, आणि नितीन सरदेसाई हे देखील सहआरोपी उपस्थित होते.

YouTube video player

यावेळी सुनावणी (Hearing) सुरु होताच न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांना गुन्हा कबूल आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरेंनी ‘मला गुन्हा मान्य नाही’ असं स्पष्ट शब्दात सांगितलं. त्यामुळे अवघ्या काही मिनिटातच ठाणे कोर्टातील सुनावणी संपली. राज ठाकरेंनी गुन्हा कबूल नसल्याचे सांगितल्यावर या प्रकरणावर लवकर तोडगा काढण्याची अपेक्षा न्यायाधीशांनी व्यक्त केली.

दरम्यान, त्यानंतर न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी “एक महिन्यात प्रकरण संपून जाईल, सहकार्य करा. जर सहकार्य केले तर जून महिन्यापर्यंत प्रकरण संपेल,” असे नमूद केले. राज ठाकरे यांच्या बाजूने ॲड. सयाजी नांगरे आणि ॲड. राजेंद्र शिरोडकर यांनी युक्तिवाद केला. राज ठाकरे यांच्यावर याप्रकरणात “मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या, परप्रांतीयांना लक्ष्य केले आणि त्यांच्यात हिंसाचाराला प्रोत्साहन दिले”, असा आरोप करण्यात आला होता.

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...