Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याराज ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना संदेश ; म्हणाले, तडजोड करावी..

राज ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना संदेश ; म्हणाले, तडजोड करावी..

चिपळूण | Chiplun

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी राज्याचा दौरा सुरु केला आहे. एकीकडे शरद पवार (Sharad Pawar), दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि तिसरीकडे राज ठाकरेंनी कोकणापासून दौऱ्याला (Tour of Konkan) सुरुवात केली आहे. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला असून पुन्हा एकदा त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर (Maharashtra Political Condition) भाष्य करणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात जो व्याभिचार सुरू आहे, त्यावर मी मेळावा घेऊन संताप व्यक्त करणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. ते आज चिपळूनमध्ये होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला, ते म्हणाले, येत्या १५ दिवसात मेळावा घेणार आहे. हा मेळावा घेऊन मनातील संताप बाहेर काढायचा आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीवर आणि राजकीय व्याभिचारावर भाष्य करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली. मला तडजोड करावी लागली तर घरात बसेन. पण तडजोड करणार नाही. राज्यात जो व्याभिचार सुरू आहे. तो मी करणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

नवाब मलिक यांना हायकोर्टाचा झटका ; ‘त्या’ प्रकरणातील जामीन अर्ज फेटाळला

राज ठाकरे यांनी त्यांच्या कोकण दौऱ्याची सुरवात चिपळूण पासून केली आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हंटले की, पक्ष सांगेल ते काम करावे लागेल अन्यथा पदावर राहता येणार नाही. आपण आपला विचार पोहोचवण्याची आवश्यकता असून पदाधिकाऱ्यांनी पदांनी एकमेकांशी बोलण्याऐवजी मनांनी एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे, असे ते म्हणाले.

Coal Scam : कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी कॉंग्रेसच्या माजी खासदारासह सहा जण दोषी

तुमच्यातील राग कमी होऊ देऊ नका

राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सुचना देताना म्हंटले की, महाराष्ट्रावरती प्रेम करा कमी होऊ देऊ नका, तुमच्यातला राग कमी होऊ देऊ नका, महाराष्ट्रासाठी लढा. महाराष्ट्रातील नागरिकांवरती प्रेम करा. पक्ष नव्हे तर एक कुटुंब म्हणून काम करा, आज उपस्थित असणाऱ्या लोकांचा एक वॉट्सअप ग्रुप तयार करा. तुमचे काम चांगले पाहिजे, कुणाकडून तक्रारी येऊ नयेत अन्यथा कारवाई केली जाईल. काम करणार नसतील तर दुसरी माणसे येतील, माणसांची कमी नाहीये. मनसेचा आमदार, खासदार झाला पाहिजे, असे लोकांना वाटतेय, असेही ते म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या