Saturday, May 4, 2024
Homeनाशिकमनसेना शहराध्यक्ष दातीर यांना अटक व जामिनावर मुक्तता

मनसेना शहराध्यक्ष दातीर यांना अटक व जामिनावर मुक्तता

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मनसेना अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray )यांनी दिलेला अल्टिमेटम संपल्यामुळे पोलिसांनी मनसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली होती मात्र शहराध्यक्ष दिलीप दातीर ( MNS City President Dilip Datir )फरार झाले होते. त्यांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ च्या पथकाने सापळा रचत पाथर्डी फाटा येथील एका हॉटेलवर अटक केली व त्यांना सातपूर पोलीस ठाण्याच्या हवाली केले. पोलिसांनी त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.

- Advertisement -

मनसेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला अल्टिमेटम संपल्यामुळे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा पठण करण्याकरिता तयारी केली होती . मात्र पोलिसांनी ( दि. ४ ) रात्री पासून मनसेना पदाधिकाऱ्यांची धडपकड सत्र सुरु केली. दरम्यान नाशिक आयुक्तालयाच्या हद्दीतून मनसेच्या २९ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना १५ दिवसांकरिता हद्दपारीची कारवाई केली. तर मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार व शहराध्यक्ष दिलीप दातीर फरार झाले होते.

दरम्यान पोलीस त्यांच्या मागावर होते. याबाबत गुन्हे शाखा सहाय्यक आयुक्त वसंत मोरे यांनी अंकुश पवार व दिलीप दातीर यांना पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक तयार केले होते. दरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोपट कारवाल,अंमलदार चंद्रकांत गवळी,नंदू नांदुर्डीकर,संपत सानप,संजय सानप,अतुल पाटील,यादव डंबाळे,प्रकाश बोडके यांच्या पथकाने शहरातील हॉटेल्समध्ये चौकशी सुरु केली होती.

यादरम्यान पाथर्डी फाटा येथील एका हॉटेल मधून दिलीप दातीर यांना अटक केली व त्यांना सातपूर पोलीस ठाण्याच्या ( Satpur Police Station )स्वाधीन केले. पोलिसांनी त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या