Monday, October 28, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMNS-Shivsena Shinde Group: मनसेची शिवसेना शिंदेगटाकडे मोठी मागणी; १० जागांसाठी पाठवला प्रस्ताव?

MNS-Shivsena Shinde Group: मनसेची शिवसेना शिंदेगटाकडे मोठी मागणी; १० जागांसाठी पाठवला प्रस्ताव?

मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आता प्रचाराला उतरले आहे. तर दुसरीकडे लोकसभेला महायुतीला मदत करणाऱ्या मनसेने मदतीसाठी हात पुढे केला आहे. मनसेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १० जागांचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील १० जागांवर मनसेने प्रस्ताव पाठवला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे या जागा मनसेसाठी सोडणार का? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मनसेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला १० जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामध्ये राज्यातील विविध मतदारसंघांचा समावेश आहे. माहिममध्ये शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत. या जागेवर मनसेचे अमित ठाकरे हे पहिल्यांचा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी मनधरणी केली जात आहे. तसंच आता मनसेनं शिवसेनेकडे १० जांगावर मदत करा अशी मागणी केल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

मनसे नेते आणि उमेदवार अमित ठाकरे यांच्यासाठी उमेदवारी मागे घ्यावी अशी चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे सरवणकर यांनी रविवारी, दुसऱ्यांदा वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. अवघ्या 10 मिनिटांसाठी सदा सरवणकर हे वर्षा बंगल्यावर आले होते. त्यानंतर सदा सरवणकर काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

माहिमच्या जागेवरुन ट्विस्ट
शिवसेनेचे सदा सरवणकर हे या मतदारसंघातून अनेक वर्षांपासून आमदार आहे. त्यामुळे सदा सरवणकर हे आपला उमेदवारीचा दावा सोडायला तयार नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी सदा सरवणकर यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण आतापर्यंत त्यांना त्यात यश आलेले नाही. या मतदारसंघात ठाकरे गटाकडूनदेखील उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पण सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घेतला तर माहिममध्ये ठाकरे गट विरुद्ध मनसे अशी थेट लढत बघायला मिळेल.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या