Saturday, May 17, 2025
Homeराजकीयमनसेला मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

मनसेला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई | Mumbai

- Advertisement -

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी (Mumbai Municipal Corporation Elections) सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच मुंबईत मनसेच्या (MNS) एका बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा (Resignation) दिला आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत मनसेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे…

श्री म्हसोबा महाराज यात्रेला सुरुवात

याबाबत अधिक माहिती अशी की, मनसेचे मसल मॅन अशी ओळख असलेल्या मनिष धुरी (Manish Dhuri) यांनी राज ठाकरेंना पत्र लिहून आपल्याकडे असणाऱ्या पदाचा राजीनामा दिला आहे. धुरी हे अंधेरी विभागाचे अध्यक्ष आहेत. तसेच धुरी हे राज ठाकरेंचे (Raj Thackeray) भारतीय विद्यार्थी सेनेपासून कट्टर समर्थक आहेत. मनसेच्या अनेक आंदोलनात मनिष धुरी यांचा आक्रमक सहभाग असायचा. त्यानंतर आता धुरी यांनी राज ठाकरेंना पत्र लिहून सगळ्या पदांचा राजीनामा देत असल्याचे म्हटलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

“मुख्यमंत्र्यांचे चहापानाचे बिल दोन कोटींपेक्षा जास्त, त्यात काय…”; अजितदादा भडकले

दरम्यान, पश्चिम उपनगरातील पक्षांतर्गत गटबाजीमुळेच धुरी यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. तसेच पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनीष धुरी यांनी या पत्रात राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. तसेच वैयक्तिक कारणामुळे सर्व पदांचे राजीनामे देत असून पक्षात यापुढे राज ठाकरे समर्थक म्हणून काम करेल, अन्य राजकीय पक्षात जाणार नसल्याचे मनीष धुरी यांनी म्हटलं आहे. तर धुरी यांच्या जागी अंधेरी विभाग अध्यक्षपदाची (Andheri Division President) धुरा कुणाकडे जाणार याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

द्राक्ष निर्यातदार कंपनीच्या व्यवस्थापकाचा अपघाती मृत्यू

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या