Monday, May 27, 2024
Homeराजकीय'मी हिंदवी रक्षक,मी महाराष्ट्र सेवक' मनसेचे नवे घोषवाक्य

‘मी हिंदवी रक्षक,मी महाराष्ट्र सेवक’ मनसेचे नवे घोषवाक्य

पुणे |प्रतिनिधी| Pune

पुण्यात आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे सभासद मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी नवीन घोषवाक्य जाहीर केले. ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’, असं मनसेचं नवं घोषवाक्य असेल असे राज ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

सदस्यनोंदणीला सुरुवात झाल्यावर राज ठाकरें म्हणाले, गणेशोत्सव, दसरा, नवरात्र, दिवाळीत अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी एक मोहिम उघडली जाणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी, चौकात मनसेचे बॅनर, पोस्टर लागले पाहिजेत. ते कसे असावेत, काय काय असावं हे तुम्हाला कळविले जाईल. परंतू, मला ते सर्वत्र दिसायला हवेत. असेही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

यावेळी कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक पक्षाला दोन ते अडीच वर्षानंतर सदस्य नोंदणी करावी लागते त्यानुसार ही नोंदणी होत असल्याचं ठाकरे हे म्हणाले.

यावेळेला जे सदस्य होणार आहेत त्या सदस्याला प्रत्येक आठवड्यात काहीतरी नवीन गोष्ट पक्षाकडून त्यांच्या मोबाईलवर जाणार आहे. त्यामध्ये माझे भाषणं असतील. महाराष्ट्रासंबंधी काही विषय असतील अशा गोष्टी त्यामध्ये असतील, या सदस्य नोंदणीमध्ये मी माझं पहिलं नाव नोंदवलं आहे. तुम्हीही मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावं. असं आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना यावेळी केलं.

यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, वसंत मोरे, बापू वासगावकर मनसेच्या महिला पदाधिकारी व पुणे शहरातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्षातील उणीदुणी चव्हाट्यावर नको

राज ठाकरेंनी आपल्यातील वाद सोशल मीडियावर पोस्ट करून नयेत असा दम यावेळी पदाधिकाऱ्यांना भरला. राज्यात दिवाळीनंतर कधीही निवडणुका लागू शकतात. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी कधीही निवडणूक लागेल. असेही राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना म्हणाले.

शहराध्यक्षपदावरून हटवल्यानंतर वसंत मोरे पहिल्यांदाच शहर पक्ष कार्यालयात

दरम्यान, पुण्यातील नगरसेवक आणि मनसे नेते वसंत मोरे आज शहराध्यक्षपदावरून हटवल्यानंतर पहिल्यांदाच शहर पक्ष कार्यालयात हजर झाले होते. शहराध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर वसंत मोरे पक्ष कार्यालयात गेले नव्हते. मात्र आज ते पक्ष कार्यालयात दिसल्याने त्यांची नाराजी दूर करण्यात राज ठाकरे यांना यश आल्याचं बोललं जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज पुण्यात मनसे सदस्य नोंदणीला सुरुवात झाली यावेळी वसंत मोरे उपस्थित होते. दरम्यान, शहराध्यक्ष पदावरून तडका फडकी हटवल्यानंतर वसंत मोरे काही काळ पक्षाबद्दल नाराज असल्याचं त्यांच्या एकंदरीत वागण्यावरून स्पष्ट झालं होतं. त्यामुळे जोपर्यंत राज ठाकरे सांगणार नाहीत तोपर्यंत पक्ष कार्यालयात नाही अशी भूमिका मोरे यांनी घेतली होती. मात्र आता राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर वसंत मोरे ऍक्टिव्ह झाले असून ते पहिल्यांदा मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात हजर राहिले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या