Sunday, May 26, 2024
HomeनाशिकPolitical Special : मनसेनेत बदलाचे वारे सुरू; निवडणुकांमध्ये पुन्हा चमत्काराची तयारी

Political Special : मनसेनेत बदलाचे वारे सुरू; निवडणुकांमध्ये पुन्हा चमत्काराची तयारी

नाशिक | फारूक पठाण | Nashik

ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) नाशिक शहराध्यक्ष (Nashik City President) बदलून आश्चर्याचा धक्का दिला आहे. अवघ्या काही महिन्यांनी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका (Elections) होणार आहे. त्यादृष्टीने बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी माजी शहराध्यक्षांना का डावलण्यात आले, अशी चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे आगामी काळात आणखी बदल होणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे…

- Advertisement -

२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर विश्वास ठेऊन राज्यातील जनतेने १३ आमदार (MLA) निवडून दिले होते. तर नाशिक शहर परिसरातील चार पैकी मध्य, पूर्व व पश्चिम नाशिक या ठिकाणी तीन आमदार निवडून आले होते. यानंतर २०१२ साली झालेल्या नाशिक महापालिका निवडणुकीत देखील नाशिककरांनी तब्बल ४० नगरसेवक मनसेचे (MNS) निवडून दिले होते. त्यामुळे २०१७ पर्यंत पक्षाची सत्ता नाशिक मनपात होती. या काळातच भव्य स्वरुपात कुंभमेळा देखील झाला. कोट्यावधींची रुपयांची कामे झाली. विशेष करुन रस्त्यांची कामे झाल्याचा दावा पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.

Nashik Crime News : सिन्नरमध्ये अवैध धंदे; पोलिसांकडून चार कॉफी शॉप उद्ध्वस्त

गंगापूररोड भागात बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय, मुंबईनाका येथे ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क, पाथर्डी फाटा येथे भव्य स्वरुपात बॉटीनिकल उद्यान, पंचवटीत गोदा पार्क अशी भरपूर विकास कामे झाली होती. त्याचप्रमाणे शहरातील उड्डाणपुलांच्या खाली सुशोभीकरण देखील झाले. अशी भरपूर कामे होऊन देखील पक्षात निर्माण झालेली गटबाजी व इतर कारणांनी मनसेला २०१४ च्या विधानसभा व २०१७ च्या मनपा निवडणुकीत मोठा पराभव सहन करावा लागला. त्यावेळी राज ठाकरे यांनी आम्ही केलेली कामे जनतेपर्यंत पोहचविण्यात कमी पडल्याचे सांगितले होते. मात्र, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरे यांच्यासह युवा नेते अमित ठाकरे अत्यंत सावधपणे पुढे जातांना दिसत आहे.

Dasara Melava : मोठी बातमी! ठाकरेंचा ‘शिवाजी पार्क’वर तर शिंदेंच्या शिवसेनेचा ‘या’ ठिकाणी होणार दसरा मेळावा

कोट्यावधी रुपयांची कामे होऊन देखील एकही भ्रष्टाचाराचा आरोप देखील मनसेच्या कामांवर झाला नाही. म्हणून आगामी निवडणुकांमध्ये आता मनसेच्या वतीने केलेल्या कामांची चर्चा करुन पुन्हा सत्ता मिळावी, यासाठी काम होणार असल्याचे दिसत आहे. म्हणूनच राज यांच्यासह अमित ठाकरे सतत नाशिक दौरे करीत आहे.आता जवळपास अमित ठाकरे यांनीच नाशिकची जबाबदारी घेतली असल्याचे दिसत आहे. त्यांनी नाशिकमध्ये १२२ शाखा प्रमुखांची नेमणूक करण्यासाठी सुमारे ७५० कार्यकर्त्यांच्या मुलाखती स्वत: घेतल्या होत्या. त्याचप्रमाणे शाखा नव्हे नाका ही संकल्पना अंमलात आणून पक्षातील नेते, पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. आता शहरातील महत्वाच्या पदाधिकार्‍यांमध्ये बदल करण्यास सुरूवात झाली असून दोन दिवसांपूर्वीच माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुदाम कोंबडे यांना दिलीप दातीर यांच्या जागी नेमण्यात आले.

Rohit Pawar : अजित पवारांवर बोरवणकरांनी केलेल्या आरोपांवर रोहित पवारांचे सूचक विधान; म्हणाले, सरकारला…

थेट ‘शिवतीर्थ’ वरुन आदेश

पक्षाच्या दृष्टीने नाशिकसारख्या महत्वाच्या शहराध्यक्ष बदलण्याचे आदेश थेट शिवतीर्थवरुनच आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे स्थानिक पातळीवर अनेकांना व खुद्द माजी शहराध्यक्षांना देखील याची अगोदर कल्पना देण्यात आलेली नव्हती, अशी माहिती मिळाली आहे. यामुळे आगामी काळात कोणते बदल होणार याची उत्सुकता लागली आहे.
मराठा बहुल असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात माजी नगरसेवक तथा माजी शहराध्यक्ष दिलीप दातीरांना उतरविण्यात येणार असल्याची चर्चा पक्षात सुरू आहे. त्यामुळे त्यांना पदमुक्त करण्यात येऊन नाराजी टाळण्यासाठी नवीन शहराध्यक्ष देखील मराठाच देण्यात आल्याचे दिसत आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Gopichand Padalkar : “महाराष्ट्रात जाती-जातीत भांडण लावणारा लांडगा कोण हे सगळ्या…”; गोपीचंद पडळकरांची पुन्हा पवार कुटुंबावर टीका

- Advertisment -

ताज्या बातम्या