Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMNS on EVM: मविआपाठोपाठ मनसेलाही ईव्हीएमवर संशय; राज ठाकरे काय भुमिका मांडणार,...

MNS on EVM: मविआपाठोपाठ मनसेलाही ईव्हीएमवर संशय; राज ठाकरे काय भुमिका मांडणार, याकडे लक्ष

मुंबई | Mumbai
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने मोठे यश मिळाले. तर मविआची मोठी पिछेहाट झाली आहे. तसेच राज्यातील अनेक मतदारसंघामध्ये ईव्हीएम मशीनवरती आक्षेप घेण्यात आले आहेत, त्याबाबत अनेक उमेदवारांनी तक्रारी निवडणूक आयोगाकडे दिल्या आहेत, यासोबतच मोठ्या जोमाने निवडणुकीला सामोरे गेलेल्या मनसेला एकही जागा मिळवता आली नाही. त्यामुळे मविआ सोबतच आता मनसेने देखील ईव्हीएमवर संशय निर्माण केला आहे.

मागच्या काही दिवसापासून जे माध्यमांवर व्हीडिओ समोर येत आहेत. ते पाहता लक्षात येईल निकाल कसा मॅनेज केला आहे. हा निकाल आम्हाला मान्य नाही दहा वर्ष जे आमदार भेटत नव्हते ते आमदार एकेक लाखाच्या मताने निवडून आलेत. ईव्हीएमशिवाय हा निकाल अशक्य आहे. ईव्हीएमने घात केला आहे, असे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

एवढा मोठा विजय मिळवून देखील भारतीय जनता पक्षात आनंद व्यक्त होत नाही. ईव्हीएम विरोधात विरोधी पक्ष किती एकत्र आला, तरी काही होणार नाही. देशात काहीतरी चुकीचे चाललेय हे आता कळले पाहिजे, अमेरिका सारख्या देशात जर बॅलेटवर मतदान होत असेल तर मग इथे कशाला ईव्हीएम पाहिजे असा सवाल देखील यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले अविनाश जाधव
न्यायालय त्यांचे, निवडणूक आयोग त्यांची मग आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? या पुढच्या निवडणुका आम्ही लढवायच्या की नाही असा प्रश्न आता मला पडला आहे. हा निकाल सेट होता सगळेच यांचे निवडून आले असते तर लोकांनी यांना चपलेने मारले असते, असे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची लाट होती ही दिसत नव्हती, या उलट भारतीय जनता पक्षाबद्दलचा राग दिसला, मग इतक्या जागा कशा निवडून आल्या असे म्हणत त्यांनी शंका उपस्थित केली आहे.

ईव्हीएमबाबत राज ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडतील. उमेदवारांना लोक शिव्या घालत होते त्या लोकांना. निवडणुकीत एक पिक्चर तयार केला. त्यात लाडकी बहीण बसवली, बटेंगे तो कटिंग हे बसवले गेले. निकालानंतर मनसेच्या झालेल्या बैठकीत राज ठाकरे काहीही बोलले नाहीत. त्यांनी फक्त उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतले. लवकरच राज ठाकरे यावर बोलणार आहे. राज ठाकरे जेव्हा बोलतील त्यावेळी राज्याला कळेल ह्या निवडणुकीमध्ये काय काय झालं. मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत आमची कोणतीही अपेक्षा नाही. मनसे आणि राज ठाकरे यांची फसवणूक महायुती एवढी कोणीच केली नाही. लोकसभेवेळी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र, त्याची परतफेड आता महायुतीने कशी केली आहे हे तुम्हीच बघताय असे म्हणत अविनाश जाधव यांनी हल्लाबोल केला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...